शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियात जागोजागी मृतदेहांचा खच

By admin | Updated: March 22, 2015 00:04 IST

बोको हरामने नायजर आणि चॅडमधून पळ काढताना अनेकांची निर्घृण हत्या केली. या भागात दाखल झालेल्या सैनिकांना पावलोपावली मृतदेहांचे खच सापडले असून अनेकांचे गळे चिरण्यात आलेले आहेत

दमास्क : बोको हरामने नायजर आणि चॅडमधून पळ काढताना अनेकांची निर्घृण हत्या केली. या भागात दाखल झालेल्या सैनिकांना पावलोपावली मृतदेहांचे खच सापडले असून अनेकांचे गळे चिरण्यात आलेले आहेत. जवळपास ७० मृतदेह एका पुलाखाली सापडले. सिमेंटच्या एका पुुलाखाली जागोजागी हे मृतदेह विखुरलेले होते. वाळंवटीय गरम आणि कोरड्या हवेने अनेक मृतदेह सुकले (ममी) आहेत. मृतदेहांच्या आजूबाजूला गवत उगले होते. त्यावरून हे हत्याकांड काही महिने आधी घडले असल्याचे दिसते.लोकांची हत्या करण्यासाठीच इस्लामिक दहशतवाद्यांनी पुलाखालची जागा निवडली असावी, असे दिसते. गेल्या सहा वर्षांपासून बोको हराम हिंसाचार घडवीत आहे. बोको हरामच्या हिंसाचारात हजारो लोकांचा बळी गेला आहे.चॅडच्या एका सैनिकाने सांगितले की, गुरुवारी हे मृतदेह सापडले. कोरड्या नदीत कमीत कमी १०० मृतदेह सापडले. या परिसरात दुर्गंधी परसली आहे. या परिसरात आणखी मृतदेह गाडण्यात आले असावेत. पुलाच्या दोन्ही बाजूंवर रक्ताचे डाग पडले होते. हत्या केल्यानंतर मृतदेह पुलाखाली फेकण्यात येते होते, असे वाटते.स्थानिक रहिवासी मुसा याने सांगितले की, बोको हरामने हल्ला केला तेव्हा आम्ही झुडपाकडे धाव घेतली. दहशतवादी गोळ्या झाडत होते. पाठलाग करून त्यांनी लोकांची हत्या केली. (वृत्तसंस्था)४नायजेरियन लष्करासह चॅड, नायजेर आणि कॅमरुनच्या फौजांनी संयुक्तपणे इस्लामिक दहशतवाद्यांविरुद्ध आघाडी उघडत बोको हरामच्या ताब्यातील भाग ताब्यात घेण्यात सुरुवात केली आहे. ४२८ मार्च रोजी नायजेरियात अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. ईशान्य नायजेरियातील दहशतवादाचा बीमोड करण्यात अपयश आल्याने जोनाथन सरकारवर चौफेर टीका होत आहे.