अथेन्स : ग्रीक नागरिकांनी बेलआऊट प्रस्ताव स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे युरोपियन देशांच्या गोंधळात वाढ झाली असून, संकटग्रस्त ग्रीसने आता युरोझोनमधून बाहेर पडू नये, म्हणून युरोपियन देशांवर त्यांनाच चुचकारण्याची वेळ आली आहे. नकारार्थी सार्वमतानंतरही मदतकर्त्या संघटना ईसीबी व ईसी तसेच आयएमएफ यांनी वाटाघाटीचे संकेत दिले आहेत. ग्रीससोबत चर्चा करण्याचे संकेत मदतकर्त्या देशांनी आणि संस्थांनी देण्याचे कारण म्हणजे मतदानानंतर ग्रीसचे अर्थमंत्री यानिस व्हरोफाकीस यांनी दिलेला राजीनामा. देणगीदार देशांशी वाटाघाटी करण्यास यानिस यांनी नेहमीच विरोध केला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर युरो चलनाचे मूल्य वाढले, ही बाब मदतकर्त्या देशांसाठी उत्साहजनक होती. (वृत्तसंस्था)
ग्रीसला तारणार युरोपियन देश! वाटाघाटीचे संकेत
By admin | Updated: July 7, 2015 04:11 IST