शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण जग येईल चीनच्या नव्या अण्वस्त्राच्या टप्प्यात, एकाच वेळी १० लक्ष्यांचा वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 03:47 IST

जगात कुठेही असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकणारे ‘डाँगफेंग-४१’ (डीएफ-४१) हे अतिप्रगत आंतरखंडीय बॅलेस्टिक आण्विक क्षेपणास्त्र पुढील वर्षाच्या सुरुवातीस चिनी लष्कराच्या सक्रिय सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

बीजिंग : जगात कुठेही असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकणारे ‘डाँगफेंग-४१’ (डीएफ-४१) हे अतिप्रगत आंतरखंडीय बॅलेस्टिक आण्विक क्षेपणास्त्र पुढील वर्षाच्या सुरुवातीस चिनी लष्कराच्या सक्रिय सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.चीनने हे क्षेपणास्त्र विकसित करण्यास सन २०१२मध्ये सुरुवात केल्यापासून या महिन्याच्या सुरुवातीस देशाच्या पश्चिमेकडील वाळवंटी प्रदेशात त्याची आठवी चाचणी घेण्यात आली, असे ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ दैनिकाने म्हटले आहे. सरकारी ‘ग्लोबल टाइम्स’च्या बातमीनुसार हे क्षेपणास्त्र पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ‘रॉकेट फोर्स’ या क्षेपणास्त्र दलात सन २०१८च्या पूर्वार्धात दाखल होण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते ‘डीएफ-४१’ कदाचित याआधीच लष्करात दाखल होऊन ते अधिक अचूक करण्यासाठी त्याच्या चाचण्या घेतल्या जात असाव्यात.चीनच्या मुख्य भूमीवरून सोडलेल्या ‘डीएफ-४१’च्या टप्प्यात जगातील कुठलेही लक्ष्य येऊ शकत असल्याने आक्रमक अस्त्राखेरीज इतरांवर वचक ठेवण्यासाठीही चीनला या क्षेपणास्त्राचा सामरिक उपयोग होईल, असे तज्ज्ञांना वाटते. या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगाच्या दसपट (१० मॅच) असल्याने ते सोडल्यापासून जेमतेम एका तासात जगातील कोणत्याही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकेल. (वृत्तसंस्था)>डीएफ-४१ची गुणवैशिष्ट्येकमाल पल्ला- १२ हजार किमी.कमाल वेग- १० मॅचहून अधिकअण्वस्त्रे- एकावेळी १० पर्यंतप्रत्येक अण्वस्त्राने स्वतंत्र लक्ष्यभेद शक्यघन इंधनटाक्यांचे तीन टप्पे

टॅग्स :chinaचीन