शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

इंग्रजी न येणाऱ्यांची मायदेशी रवानगी

By admin | Updated: January 19, 2016 08:26 IST

सरकारच्या एका आदेशाने इंग्रजी येत नसलेल्या नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे. इंग्रजी येत नसेल तर अशा नागरिकांनी देश सोडून जावे असा

लंडन : सरकारच्या एका आदेशाने इंग्रजी येत नसलेल्या नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे. इंग्रजी येत नसेल तर अशा नागरिकांनी देश सोडून जावे असा आदेश सरकारने दिल्याने प्रवासी आणि अन्य व्हिसावर येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. द टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी स्पष्ट म्हटले आहे की, जर दोन वर्षांत तुम्ही इंग्रजी शिकू शकत नसाल तर तुमच्यावर देशाबाहेर जाण्याची वेळ येऊ शकते. तथापि, इंग्रजी सुधारण्यासाठी सरकार लोकांची काळजी घेतानाही दिसत आहे. बाहेरून येथे आलेल्या नागरिकांंसाठी विशेषत: महिलांसाठी इंग्रजी शिकण्याकरिता सरकारने २० मिलियन पौंडांची तरतूदही केली आहे. ब्रिटनमध्ये जे जोडीदारासह पाच वर्षांच्या व्हिसावर येतात त्यांची इंग्रजीची चाचणी अडीच वर्षांनी घेण्यात येणार आहे. त्यांच्या इंग्रजीत किती सुधारणा झाली याची माहिती यावरून मिळेल. कॅमेरुन यांनी याबाबत संदेश देताना म्हटले आहे की, जर तुम्ही इंग्रजी शिकण्यात सुधारणा केली नाही, तर या देशात राहण्यासाठी तो एक मोठा अडथळा ठरू शकतो. (वृत्तसंस्था)