शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

मतदारांची बोटे छाटणाऱ्यांचा खात्मा

By admin | Updated: June 18, 2014 05:28 IST

अफगाणिस्तानातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या ११ ज्येष्ठ नागरिकांची बोटे छाटणाऱ्या दोन तालिबान दहशतवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे.

हेरात : अफगाणिस्तानातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या ११ ज्येष्ठ नागरिकांची बोटे छाटणाऱ्या दोन तालिबान दहशतवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे. एका मतदाराने दोनदा मतदान करू नये यासाठी मतदान केलेल्यांच्या बोटावर शाई लावण्यात आली होती; परंतु या शाईमुळेच तालिबानच्या धमकीला भीक न घालणाऱ्या नागरिकांची ओळख पटली.तालिबानने मतदान केल्यास याद राखा, अशी धमकी दिली होती. मात्र, अफगाण नागरिकांनी तालिबानला अजिबात न जुमानता मतदान केले होते. यशस्वी मतदानामुळे चिडलेल्या तालिबानच्या दहशतवाद्यांनी हेरातमध्ये ११ ज्येष्ठ नागरिकांची शाई लागलेली बोटे छाटली होती. तालिबान कमांडर मुल्ला शीर आगा आणि त्याच्या एका साथीदाराने हे दुष्कृत्य केले होते. पोलिसांनी या दोघांचा चकमकीत खात्मा केला. (वृत्तसंस्था)