शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जपानने लागू केली आणीबाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 01:35 IST

जगातल्या जवळपास सगळ्या देशांतील लोकांमध्ये कमी-अधिक प्रमाणात या सक्तीचं उल्लंघन करण्यात आलं, पण जपानी लोकांनी सरकारी बंधनांचं उल्लंघन तर जाऊ द्या

जपानजपान हा मुळातच अतिशय शिस्तशीर देश आहे. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर संपूर्ण जगात ज्या पद्धतीनं ‘उपचार’ करावे लागले, लोकांना घराबाहेर पडण्यापासून सक्तीनं मनाई करावी लागली, लॉकडाऊन करावं लागलं, तसे कठोर उपाय जपानला करावे लागले नाहीत.

जगातल्या जवळपास सगळ्या देशांतील लोकांमध्ये कमी-अधिक प्रमाणात या सक्तीचं उल्लंघन करण्यात आलं, पण जपानी लोकांनी सरकारी बंधनांचं उल्लंघन तर जाऊ द्या, पण स्वत:हूनच आपल्यावर बंधनं लादून घेतली. तेथेही कोरोनाचा फैलाव होत असला, तरी तिथलं प्रमाण जगातील अनेक देशांपेक्षा कमी आहे, याचंही एक प्रमुख कारण म्हणजे जपानी लोकांची शिस्त आणि प्रसंगानुरुप वागण्याचा त्यांचा स्वभाव. त्यामुळेच जपानमध्ये आजही सक्तीचं लॉकडाऊन लागू करण्यात आलेलं नाही. त्यापेक्षा मवाळ धोरण अवलंबताना जपानमधील सात प्रांतांमध्ये केवळ आणीबाणी लागू करण्यात आली होती. ‘घरी बसा’ एवढंच लोकांना सांगावं लागलं होतं. आजही त्यात काहीही फरक पडलेला नाही. तरीही कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. त्यामुळे जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांनी परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला आणि आता थोडी आणखी कडक पावलं उचलली आहेत. आता संपूर्ण देशात आणीबाणी लागू केली जाणार आहे. कोरोनाच्या संसर्गानंतर आजपर्यंत तिथल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची वेळ जपान सरकारवरआलेली नाही. जपानमध्ये जानेवारीच्या मध्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर काल; गुरुवारपर्यंत तेथील कोरोना रुग्णांची संख्या आहे ८५०० आणि मृत्युमुखी पडेल्यांची संख्या आहे १३६.