शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मॅन्चेस्टर हल्लेखोराचे वडील-भाऊदेखील ताब्यात

By admin | Updated: May 25, 2017 08:45 IST

मॅन्चेस्टर स्फोटाप्रकरणी पोलिसांनी सलमान आबेदीचे वडील व भावाला ताब्यात घेतले आहे.

 ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 25 -  मॅन्चेस्टरमध्ये सोमवारी रात्री अमेरिकी पॉप स्टार एरियाना ग्रांदे हिच्या संगीताच्या कार्यक्रमातून हजारो लोक बाहेर पडत असताना इसिसने घडवलेल्या आत्मघाती स्फोटासंबंधित आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलीस अथक प्रयत्न करत आहेत.  याप्रकरणी पोलिसांनी सातव्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉरविकशायरमधील न्यूनिएटन येथे तपासणी केल्यानंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 
 
मॅन्चेस्टरमध्ये सोमवारी रात्री अमेरिकी पॉप स्टार एरियाना ग्रांदे हिच्या संगीताच्या कार्यक्रमातून हजारो लोक बाहेर पडत असताना इसिसने घडवलेल्या आत्मघाती 22 जणांचा मृत्यू झाला होता तर 59 जण जखमी झालेत. या कार्यक्रमासाठी तरुण व किशोरवयीन मुले मोठ्या प्रमाणात आली होती.  शो संपल्यावर एरियाना ही स्टेजवरून गेल्यानंतर हा स्फोट झाला.
या स्फोटात ठार झालेल्या आत्मघाती हल्लेखोराचे नाव सलमान अबेदी असे होते व तो 22 वर्षांचा होता, असे मॅन्चेस्टर पोलिसांनी मंगळवारी रात्री जाहीर केले. तर दुसरीकडे लीबियामध्ये सलमानचे वडील आणि भावालाही ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. 
(ब्रिटनमध्ये अतिरेकी स्फोटात 22 ठार)
या स्फोटाप्रकरणी बुधवारी पोलिसांनी विगनमध्ये पाचव्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते.  यापूर्वी लंडनमध्ये 7 जुलै 2005 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. मध्य लंडनमध्ये त्यावेळी साखळी स्फोट घडवून आणण्यात आले होते. यात 52 जणांचा मृत्यू झाला होता तर 700 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. सोमवारी झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ब्रिटनमध्ये संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांसहीत सैनिकदेखील तैनात करण्यात आले आहेत.
 
सलमान आबेदीचा भाऊ हाशिम आबेदी ताब्यात
 
कोण होता हल्लेखोर ?
मिळालेल्या माहितीनुसार,  मॅन्चेस्टरमधील लीबियन कुटुंबात जन्मलेला सलमान आबदी (22 वर्ष)  सेलफॉर्ड युनिर्व्हसिटीचा माजी विद्यार्थी होता. मॅन्चेस्टर मेट्रोपॉलिटन युनिर्व्हसिटीसोबत संबंधित असलेल्या हामिद-अल-सैद यांनी सांगितले की, सलमानचे त्याच्या कुटुंबीयांसोहत चांगले संबंध नव्हते. त्याचे कुटुंबीय त्याला योग्य वळणावर आणण्यासाठी प्रयत्न करत राहिले, मात्र त्यांना यश आले नाही.