इस्लामाबाद- पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी आठ शिया नागरिकांची हत्या केली. शिया नागरिक क्वेट्टा जिल्ह्यातील हजार गंजी भागात बसमधून प्रवास करत होते. त्यावेळी सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात हजरा समुदायाचे आठजण ठार झाले असून, एक जखमी झाला आहे. शिया नागरिकांना लक्ष्य करून मारण्यात आले. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. पण लष्कर ए झांगवी ही कट्टरवादी सुन्नी संघटना नेहमीच शियांना लक्ष्य करत असते. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानात आठ जणांची हत्या
By admin | Updated: October 24, 2014 03:29 IST