शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

सेनेगल फुटबॉल स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू

By admin | Updated: July 16, 2017 07:39 IST

सेनेगल स्टेडियममध्ये फुटबॉल लीग कप फायनलसाठी झालेल्या स्पर्धेत चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे

ऑनलाइन लोकमतडकार, दि. 16 - सेनेगल स्टेडियममध्ये फुटबॉल लीग कप फायनलसाठी झालेल्या स्पर्धेत चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती स्थानिक क्रीडा मंत्र्यांनी दिली आहे. या चेंगराचेंगरीत स्टेडिममवर आलेले फुटबॉलचे अनेक चाहते जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका तरुण मुलीचासुद्धा समावेश आहे. या दुर्घटनेत जवळपास 60 जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी डकारमधील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती सेनेगलचे क्रीडा मंत्री मातर बा यांनी दिली आहे. तसेच अशा प्रकारच्या स्पर्धेचं पुन्हा आयोजन करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. स्टेडियममध्ये अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. एएफपीच्या वृत्तानुसार, फुटबॉल लीग कप फायनलसाठी झालेल्या या स्पर्धेदरम्यान यूएस वाकाम आणि स्टेड डे माउबर या दोन संघांमध्ये वाद झाला. त्यानंतर यूएस वाकाम संघाच्या समर्थकांनी स्टेड डे माऊबर संघाच्या चाहत्यांवर दगडफेक करण्यास सुरुवातक केली. त्यामुळे स्टेडियममध्ये बसलेले चाहते पळापळ करू लागले. फुटबॉल पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या धावपळीत बाजूची एक भिंत कोसळली. त्याच वेळी पोलिसांनीही जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. घाबरलेले प्रेक्षक गर्दीतून वाटत काढत सैरावैरा पळू लागले आणि त्यातच 8 प्रेक्षकांचा मृत्यू झाला. स्टेडियममधील भिंतसुद्धा थेट प्रेक्षकांच्याच अंगावर कोसळली. त्यातही बरेच जण जखमी झालेत. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र सेनेगल स्टेडियमवर चोख सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळेच ही दुर्घटना घटल्यानं लोकांना संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा(पश्चिम बंगालच्या गंगासागर यात्रेत चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू)(सबरीमाला मंदिरात चेंगराचेंगरीत 20 भाविक जखमी)

तर गेल्या काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालच्या गंगासागर येथील यात्रेत चेंगराचेंगरी झाली होती. या यात्रेमध्ये चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू झाला होता. अनेक जण जखमी होते. जखमींमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार बंकिम हाजरा यांचाही समावेश होता. या घटनेनंतर बचावाकार्यासाठी पथकं तातडीने घटनास्थळी दाखल झाली होती. चेंगराचेंगरीची माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफ आणि पोलीस घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जानेवारीत मकर संक्रांतीच्या निमित्ताने गंगासागर यात्रेत भाविक गंगास्नानसाठी येतात. गंगासागरला कुंभ मेळ्यानंतर देशातील सर्वात मोठा मेळा मानला जातो. भाविक कोचुबेरिया घाट येथून एका बोटीत जाण्याचा प्रयत्न करत असताना चेंगराचेंगरी झाली होती.  पश्चिम बंगालचे ग्रामविकास मंत्री सुब्रता मुखर्जी यांच्या माहितीनुसार, मकर सक्रांतीनिमित्त डुबकी मारण्यासाठी आणि कपिल मुनी मंदिरात पूजा करण्यासाठी जवळपास 16 लाख भाविक आले होते.