शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

आयफेल टॉवर, वेलकम टू ट्विटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 13:00 IST

जगप्रसिद्ध ताजमहाल व स्टॅच्यू आॅफ लिबर्टीने १२६ वर्षे जुन्या आयफेल टॉवरचे टिष्ट्वटरवर स्वागत केले आहे. जगात सर्वाधिक पर्यटक आकर्षित करणारा ‘आयफेल टॉवर’ गेल्या

लंडन : जगप्रसिद्ध ताजमहाल व स्टॅच्यू आॅफ लिबर्टीने १२६ वर्षे जुन्या आयफेल टॉवरचे ट्विटरवर स्वागत केले आहे. जगात सर्वाधिक पर्यटक आकर्षित करणारा ‘आयफेल टॉवर’ गेल्या आठवड्यात ‘ट्विटर’चा अधिकृत सदस्य बनला. आयफेल टॉवरने आपल्या अकाऊंटवर पहिले ट्विट फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत केले आहे. या ट्विटमध्ये तो म्हणतो, मी १८८९ पासून पॅरिसवासीय असून आता ट्विटररवरही दिमाखात झळकत आहे. मुगल बादशहा शहाजहानने बांधलेला आणि जगातील आश्चर्यांपैकी एक अशा ताजमहालने ‘वेलकम’ असे ट्विट करत ‘आयफेल’चे ट्विटरवर स्वागत केले, तर आयफेलने खूप खूप आभार म्हणत ताजमहालच्या आॅनलाईन स्वागताचा स्वीकार केला. १०६३ फूट उंचीच्या आयफेल टॉवरला दरवर्षी जगभरातील ७० लाख पर्यटक भेट देतात. आयफेलचे फेसबुक अकाऊंट असून त्यावर त्याचे १७ लाख चाहते आहेत. मात्र, आयफेलने गेल्या आठवड्यापर्यंत ट्विटरपासून स्वत:ला दूर ठेवले होते. ‘अ‍ॅट द रेट ला टुरआयफेल’चे ट्विटरवर आगमन होताच इतर जगप्रसिद्ध स्मारकांच्या अधिकृत खात्यांनी त्याचे तातडीने स्वागत केले, असे टेलिग्राफने म्हटले आहे. माझ्या प्रिय भगिनीचे ट्विटरवर स्वागत, असे ट्विट स्टॅच्यू आॅफ लिबर्टीने केले आहे. स्टॅच्यू आॅफ लिबर्टीच्या मूर्तीची संकल्पना एका फ्रेंच मूर्तिकाराची असून आयफेलने ही मूर्ती साकारली. १९ व्या शतकात ही मूर्ती फ्रान्सच्या जनतेकडून अमेरिकेला भेट देण्यात आली होती. ताजमहालसह न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगनेही आयफेल टॉवरचे टिष्ट्वटरवर स्वागत केले आहे. आयफेल टॉवरबाबतचे वृत्त, ऐतिहासिक तथ्ये याची माहिती देण्यासाठी आपण ट्विटर अकाऊंट उघडण्याचा निर्णय घेतला, असे आयफेल टॉलर प्रशासनाने सांगितले. (वृत्तसंस्था)