शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपदी सिसी

By admin | Updated: June 4, 2014 00:35 IST

कैरो : इजिप्तमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी लष्करप्रमुख अब्देल फतेह अल-सिसी हे ९६. ९ टक्के मते मिळवून विजयी झाले असून, याबाबतची अधिकृत घोषणा इजिप्तच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी रात्री केली़

कैरो : इजिप्तमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी लष्करप्रमुख अब्देल फतेह अल-सिसी हे ९६. ९ टक्के मते मिळवून विजयी झाले असून, याबाबतची अधिकृत घोषणा इजिप्तच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी रात्री केली़
निवडणूक आयोगाचे अध्यक्ष अन्वर अल-सिसी यांनी सांगितले की, अल-सिसी यांना २३. ७८ दशलक्ष मते मिळाली तर त्यांचे एकमेव प्रतिस्पर्धी डाव्या विचारसरणीचे हमदीन सबाही यांना केवळ तीन टक्के मते मिळाली. निवडणूक निकालाची घोषणा झाल्यानंतर राजधानी कैरोच्या प्रसिद्ध तहरीर चौकात शेकडो लोक जमा झाले. त्यांनी आतषबाजी करून विजयाचा आनंद साजरा केला. त्यांनी लष्कराच्या समर्थनार्थ गीतेही गायली.
या निवडणुकीसाठी ४७.४५ टक्के मतदान झाले होते. इजिप्तमधील पहिले लोकनियुक्त सरकार अल-सिसी यांनीच उलथवून टाकले होते. जनक्षोभामुळे होस्नी मुबारक यांना पायउतार व्हावे लागल्यानंतर झालेल्या निवडणुकीद्वारे मुस्लिम ब्रदरहुडच्या मोहंमद मुर्सी यांचे सरकार सत्तेवर आले होते. मात्र, मुर्सी यांच्याविरुद्धही प्रचंड असंतोष निर्माण होऊन देशात यादवी उफाळण्याचे संकट निर्माण झाल्याने अल-सिसी यांनी लष्करी बळाचा वापर करत गेल्यावर्षी मुर्सी यांचे सरकार उलथवून टाकले होते. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळाल्याने मुर्सी यांचे सरकार उलथवून टाकण्याच्या त्यांच्या कृतिवरही एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. (वृत्तसंस्था)