शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

इजिप्त एअरच्या विमानाचा अपघात, सर्च ऑपरेशन सुरु

By admin | Updated: May 19, 2016 13:09 IST

इजिप्त एअरच्या 66 प्रवाशांना घेऊन जाणा-या MS804 विमानाचा अपघात झाल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिका-यांनी दिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
कैरो, दि. 19 - इजिप्त एअरच्या 66 प्रवाशांना घेऊन जाणा-या MS804 विमानाचा अपघात झाल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिका-यांनी दिली आहे. या विमानाचा शोध घेण्याचं काम अजूनही सुरु आहे. पॅरिसहून कैरोला निघालेलं हे विमान अचानक रडारवरुन गायब झालं होतं. स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी 2.45 वाजता विमान रडारवरुन गायब झाले होते. पण इतका वेळ होऊनही विमानाने जवळच्या कोणत्याच विमानतळावर लँडींग केलं नसल्याने विमानाचा अपघात झाली असल्याची शक्यता इजिप्त एअरच्या अधिक-यांनी दर्शवली आहे. इजिप्तचे पंतप्रधान स्वत: इजिप्त एअरच्या आपत्कालीन विभागात हजर राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
 
इजिप्त एअरचं विमान अचानक रडारवरुन गायब झालं होतं. पॅरिसहून कैरोला जाणा-या या विमानात 56 प्रवासी आणि 10 क्रू मेम्बर्स होते. एअरबस A320 जमिनीपासून 37 हजार फुटांवर उडत असताना स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी 2.45 वाजता विमान रडारवरुन गायब झाले. 
 
विमानाने 11 वाजून 9 मिनिटांनी चार्ल्स द गॉल येथून उड्डाण केले होते अशी माहिती इजिप्त एअरने दिली आहे.  मात्र काही वेळातच हे विमान रडारवरून गायब झाले. कंट्रोल रूमशी कोणताही संपर्क होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. इजिप्त‍च्या आसपासच्या भागावर इसीस या दहशतवादी संघटनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे विमानाला दहशतवाद्यांनी टार्गेट केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
 
इजिप्तचं लष्करी विमान सर्च ऑपरेशन करत आहे. विमानात असलेल्या 66 प्रवाशांमध्ये 10 क्रू मेंम्बर्स असून एक लहान मुलगा, 2 बाळ आहेत. प्रवाशांमध्ये 15 फ्रेंच, 30 इजिप्त तसंच ब्रिटन, इराकी, कुवैत,  सौदी, पोर्तुगीज, बेल्जिअम, अल्जेरिअनचे नागरिक आहेत.
 
इजिप्त एअर विमानाचं अपहरणनाट्य -
29 मार्चला इजिप्त एअर विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. अलेक्झांड्रियाहून कैरोला जाणा-या इजिप्त एअरच्या MS181 या विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण करणा-या व्यक्तीने स्फोटकांचा बेल्ट बांधला असून उडवून देण्याची धमकी देत विमानाचं एमर्जन्सी लॅडींग करण्यास सांगितलं होतं. सैफ अल दिन मुस्तफा या व्यक्तीने हे अपहरण केलं होतं. पोलिसांनी त्याला नंतर अटक केली होती.