शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इबोला

By admin | Updated: August 28, 2014 20:55 IST

तीन पश्चिम आफ्रिकन देशांसाठीची विमानसेवा बंद

तीन पश्चिम आफ्रिकन देशांसाठीची विमानसेवा बंद
--------------
इबोलाची दहशत : संयुक्त राष्ट्रसंघाची मात्र निर्णयावर टीका
फ्रीटाऊन : इबोलाच्या दहशतीमुळे आणखी काही विमान कंपन्यांनी या साथीच्या केंद्रस्थानी असलेल्या तीन पश्चिम आफ्रिकन देशांसाठीची विमान उड्डाणे थांबविली आहेत. परिणामी हे देश अधिक एकाकी पडले आहेत.
सिएरा लिओनसाठीची विमान उड्डाणे तात्पुरती थांबवावीत ही फ्रान्स सरकारची विनंती एअर फ्रान्सने मान्य केली आहे. त्यामुळे सिएरा लिओनची राजधानी फ्रीटाऊन व शेजारील लायबेरियाच्या मोन्रोव्हाया येथे आता रॉयल एअर मोरोक्कोचे केवळ एकच नियमित उड्डाण उरले आहे. ब्रिटिश एअरवेजने इबोला साथीच्या भीतीमुळे सिएरा लिओन व लायबेरियासाठीची आपली उड्डाणे पुढील वर्षापर्यंत रद्द केल्याच्या दुसर्‍याच दिवशी एअर फ्रान्सनेही या देशांपासून स्वत:ला वेगळे केले. ब्रुसेल्स एअरलाईन्सची लायबेरिया, सिएरा लिओनसाठी चार, तर गिनीसाठी तीन उड्डाणे होती. मात्र, यातीलही अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शनिवारी आपण पुढील वेळापत्रक निश्चित करणार असल्याचे या कंपनीने म्हटले आहे. प्रवाशांच्या मागणीवरून या कंपनीने इबोलाग्रस्त देशांसाठी तीन स्वतंत्र उड्डाणे करण्याचे मान्य केले आहे. या विमानांद्वारे संयुक्त राष्ट्रसंघाचे ४० टन वैद्यकीय साहित्यही नेण्यात येणार आहे. इबोलाग्रस्त देशांसाठीची विमान उड्डाणे रद्द करणार्‍या विमान कंपन्यांवर संयुक्त राष्ट्रसंघाचे इबोलावरील दूत डेव्हिड नाबारो यांनी टीका केली होती. हे देश अधिक एकाकी पडत चालल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाला काम करणे कठीण बनले असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, इबोला साथीवर चर्चेसाठी हा विषाणू धुमाकूळ घालत असलेल्या देशातील आरोग्यमंत्र्यांची घानाच्या राजधानीत गुरुवारी बैठक होत आहे. इबोलाग्रस्त देशांचे प्रशासन इतिहासातील या सर्वात घातक साथीला रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला उद्रेक झाल्यापासून इबोला विषाणूने आतापर्यंत १, ४२७ नागरिकांचा बळी घेतला आहे. २,६०० नागरिकांना याची बाधा झाली असून लायबेरियाला सर्वाधिक तडाखा बसला आहे. या देशात इबोलाने ६२४ जणांचा बळी घेतला. गिनीत ४०६ तर सिएरा लिओनमध्ये ३९२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.