शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

इबोलाने 4,000 जणांचा मृत्यू

By admin | Updated: October 12, 2014 02:17 IST

इबोलाच्या साथीने आतार्पयत 4 हजार जणांचा बळी घेतला असून या जीवघेण्या साथीचा इतरत्र प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जगभर कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.

माद्रिद : इबोलाच्या साथीने आतार्पयत 4 हजार जणांचा बळी घेतला असून या जीवघेण्या साथीचा इतरत्र प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जगभर कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. पश्चिम आफ्रिकेत या साथीने कहर केला असून याच भागात मोठय़ा संख्येने लोक मरण पावले आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया ते ङिाम्बाब्वे, मॅसिडोना ते स्पेनर्पयत या साथीचा फैलाव झाला असून अनेक जण तापाने फणफणत आहेत. तसेच इबोला या घातक विषाणूंची बाधा झालेल्या अनेकांना इतरांपासून स्वतंत्र ठेवण्यात (संसर्गरोधी कक्ष) आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार या घातक साथीने 8 ऑक्टोबर्पयत 4,क्33 जणांचा मृत्यू झाला आहे. इबोलाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संयुक्त राष्ट्राने आर्थिक मदतीचे आवाहन केले असले तरी या साथीचा मुकाबला करण्यासाठी आणखी आर्थिक मदतीची गरज आहे. जवळपास 1 अब्ज डॉलरची अजून गरज आहे.
माद्रिद येथील एका नर्सला इबोला विषाणूंची लागण झाली असून तिचा मृत्यूशी संघर्ष चालू आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आर्थिक मदतीसोबत वैद्यकीय पथकांचीही मदत जरूरी आहे.
 संयुक्त राष्ट्राचे उप-सरचिटणीस ज्ॉन इलियासन यांनी डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य क्षेत्रतील कर्मचा:यांना   तसेच समाजसेवी संघटनेच्या कार्यकत्र्याना या साथीचा मुकाबला करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान-की-मून यांनीही हा लढा आणखी वीसपटीने वाढविण्याचे आवाहन केले होते. 
लायबेरियात इबोलाने 2,316 जण मृत्यू पावले आहेत. मॅसिडोनियातील जे लोक इबोलाग्रस्त ब्रिटिश व्यक्तीच्या संपर्कात आले होते, त्या लोकांना संसर्गरोधी कक्षात ठेवण्यात आले आहे.  (वृत्तसंस्था)
 
च्ही साथ आटोक्यात आणण्यासाठी र्सवकष प्रयत्न न केल्यास जानेवारीर्पयत मृतांचा आकडा लाखावर जाऊ शकतो, असा इशारा अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने दिला आहे. दरम्यान, भारताने इबोलावरील लस शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला सहकार्य करण्यास बांधील असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी जागतिक पातळीवर केल्या जात असलेल्या कामासाठी मदत करण्याची ग्वाहीही भारताने दिली आहे.