वॉशिग्टन : जागतिक आरोग्य संघटनेने पश्चिम आफ्रिकेत उद््भवलेल्या इबोलाच्या साथीनंतर आंतरराष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. या इबोलाने गेल्या मार्चपासून १००० जणांचे प्राण घेतले आहेत. अमेरिकेच्या उच्च पातळीवरील रोगशोधक एजन्सीने इबोलाचा विषाणू हा वेदनादायक, निष्ठुर व भीतिदायक असल्याचे म्हटले आहे. हे सगळेच दहशत निर्माण करणारे व गंभीर आहे; परंतु ते थोडेसे जास्त करूनही सांगितले जात आहे.एडस्मुळे एकट्या आफ्रिकेत दरवर्षी १० लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी जातो आहे. इबोलाने घेतलेल्या बळींच्या तुलनेत हे प्रमाण हजार पट जास्त आहे.फुफ्फुसाला लागण होण्यामुळे (न्यूमोनिया) मरण पावणाऱ्यांचे प्रमाण दोन क्रमांकावर आहे. आफ्रिकेत दरवर्षी मलेरिया आणि डायरियाने हजारो मुलांचे प्राण जातात. अमेरिकेत हृदयविकार आणि कर्करोग हे सर्वात मोठे जीव घेणारे असून तेथे इबोलाच्या विषाणूशी संपर्क येण्याचे प्रमाण शून्य आहे. भीती वाटायची अन्य कारणे मलेरिया, डायरिया, न्यूमोनिया अशा हजारो बळी घेणाऱ्या आजारांच्या तुलनेत किरकोळ बळी घेतलेल्या इबोलाची दहशत का? डायरिया, मलेरिया, न्यूमोनियाची सहसा साथ पसरत नाही व त्यांचा उद्रेक अचानक होऊन मृत्यूचे प्रमाण प्रचंड होऊन इबोलासारखी दहशत निर्माण करीत नाही. नेहमीच्या आजारांनी मरण पावणाऱ्यांचे प्रमाण कमी असते. (वृत्तसंस्था)
इबोला साथीची जगभरात एवढी दहशत का?
By admin | Updated: August 11, 2014 01:33 IST