शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भूकंप, त्सुनामीने जागतिक तापमानवाढ

By admin | Updated: March 27, 2015 23:59 IST

२०११ साली जपान उद्ध्वस्त करणारा भूकंप व त्सुनामीने जागतिक तापमानात वाढ झाली असून, पृथ्वीभोवती कवच असणाऱ्या ओझोनच्या थराचेही नुकसान झाले .

वॉशिंग्टन : २०११ साली जपान उद्ध्वस्त करणारा भूकंप व त्सुनामीने जागतिक तापमानात वाढ झाली असून, पृथ्वीभोवती कवच असणाऱ्या ओझोनच्या थराचेही नुकसान झाले . चार वर्षांपूर्वी जपानला बसलेल्या ९ रिक्टर तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यात हजारो इमारती नष्ट झाल्या वा त्यांचे नुकसान झाले. या प्रक्रियेत इमारतीत साठवला गेलेला ६६०० मे. टन गॅस बाहेर पडला व वातावरणात सोडला गेला. या गॅसमधील हालोकार्बन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसायनांचे प्रमाण २१ टक्क्यांनी वाढले व ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचले. भूकंपामुळे वातावरणात सोडलेल्या या रसायनासह हालोकार्बनमुळे ओझोनच्या थराचे नुकसान झाले. त्यामुळे पृथ्वीचे तापमान अधिक वाढले. यापैकी काही गॅस पर्यावरणाला घातक असल्याने सध्या वापरले जात नाहीत. यातच क्लोरोफ्लुरोकार्बन म्हणून ओळखला जाणारा सीएफसी ११ हा वायू फेस तयार करण्यासाठी वापरला जातो; पण त्यामुळे ओझोनचे नुकसान होते. १९९६ नंतर त्याचा वापर बंद करण्यात आला आहे. तसेच यावेळी सोडलेल्या गॅसमध्ये हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बनही असून एचसीएफसी -२२ हा त्याचाच एक प्रकार आहे. हा एक शक्तिशाली गॅस असून, त्याचाही वापर बंद आहे. एचएफसी वा सल्फर हेक्झाफ्लुराईड हे वायू तापमानवाढीस कारणीभूत आहेत. भूकंपानंतर वातावरणात सोडल्या गेलेल्या गॅसमध्ये एचसीएफसी -२२ या वायूचे प्रमाण ५० टक्के होते. भूकंपाआधी वातावरणात मिसळल्या जाणाऱ्या गॅसच्या तुलनेत ते ३८ टक्के जास्त होते. (वृत्तसंस्था)नुकसानीचा अंदाज काढला पाहिजे...नैसर्गिक आपत्तीनंतर वातावरणात सोडल्या जाणाऱ्या वायूंचे प्रमाण ठरवून त्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा अंदाज काढला गेला पाहिजे, असे रसायन तज्ज्ञ स्टीव्ह मोंटात्झका यांनी म्हटले आहे.