शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण तैवानला भूकंपाचा धक्का, ५ ठार

By admin | Updated: February 6, 2016 13:40 IST

दक्षिण तैवानच्या तैनान शहराजवळ शनिवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसून ५ जण ठार झाले.

ऑनलाइन लोकमत
तैपेई, दि. ६ - दक्षिण तैवानच्या तैनान शहराजवळ शनिवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसले असून या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. भूकंपाच्या धक्क्यामुळे इमारत कोसळून काही नागरिक मृत्यूमुखी पडले तर सुमारे २२१ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी मोजली गेली. 
भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे चार वाजता हा धक्का बसला. तैनान शहरापासून ३६ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे रहिवासी इमारत कोसळली ५ जण ठार झाले. तर इतर नागरिकांना अग्निशमनदलाच्या जवानांनी बाहेर काढले. लष्कराचे जवानही मदतीला धावले असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
 
 
नेपाळ आणि बिहारलाही भूकंपाचे धक्के 
नेपाळमध्येही शुक्रवारी रात्री काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची नोंद ५.५ इतकी नोंदविली गेली असून त्यात १५ जण जखमी झाले. दरम्यान, बिहारच्या उत्तर भागालाही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. राष्ट्रीय भूकंप केंद्राने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूच्या उत्तर पूर्व भागात ५५ कि.मी. अंतरावर सिंधूपालचौक जिल्ह्यात होता. पर्यटनस्थळ पोखरा येथेही धक्के जाणवले. भूकंपानंतर अनेक नागरिक घराबाहेर पळत होते. गतवर्षी २५ एप्रिलला नेपाळमध्ये ७.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपात हजारो नागरिक मृत्युमुखी पडले होते. काठमांडूपासून ५० कि.मी. अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपानंतर नेपाळमध्ये चार अथवा त्यापेक्षा अधिक तीव्रतेचे ४२८ धक्के जाणवले आहेत.