शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सौरमालेबाहेर ‘पृथ्वी’!

By admin | Updated: August 26, 2016 06:54 IST

शास्त्रज्ञांनी पृथ्वीसारखा जीवसृष्टीला पोषक वातावरण असलेला ग्रह शोधला आहे.

लंडन : शास्त्रज्ञांनी पृथ्वीसारखा जीवसृष्टीला पोषक वातावरण असलेला ग्रह शोधला आहे. या ग्रहाचे तापमान त्याच्या पृष्ठभागावर पाणी द्रव स्वरूपात अस्तित्वात राहू शकेल, एवढेच आहे. त्यामुळे आपल्या सौरमालिकेच्या बाहेर या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाला या ग्रहाचे पुरावे मिळाले आहेत. हा ग्रह प्रॉक्सिमा सेंताउरी ताऱ्याला प्रदक्षिणा घालतो. तो डोळ्यांनी दिसत नसला, तरी आपल्यापासून केवळ ४.२ प्रकाश वर्षे (जवळपास २५ खर्व मैल) अंतरावर आहे. हा ग्रह आमच्या सूर्याच्या सर्वात जवळील ताऱ्याला प्रदक्षिणा घालत आहे. त्यामुळे जीवनासाठी पोषक वातावरण आपल्याजवळच उपलब्ध असल्याचे संकेत आहेत. या ग्रहाला ‘प्रॉक्सिमा बी’ असे नाव देण्यात आले असून, तो ११ दिवसांत आपली प्रदक्षिण पूर्ण करतो. हा ग्रह आमच्या पृथ्वीहून थोडा मोठा आहे. तो गुरूसारखा वायूचा गोळा नाही, तर पृथ्वीसारखा खडकाळ आहे. तो त्याच्या ताऱ्यापासून एवढ्या अंतरावर आहे की, त्याच्या पृष्ठभागावर पाणी द्रव स्वरूपात अस्तित्वात राहू शकते. त्यामुळे या ग्रहावर वातावरण असण्याची शक्यता आहे. हे संशोधन नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. (वृत्तसंस्था)>आकार मोठाजीवसृष्टीला पोषक क्षेत्रात या पूर्वीही ग्रह आढळले आहेत. त्यांचा सर्वांचा आकार पृथ्वीहून ४० टक्क्यांनी अधिक असून, त्यांची रचना समजून घेणे आव्हानच आहे. तथापि, प्रॉक्सिमा बी हा ग्रह पृथ्वीची प्रतिकृती असल्यासारखा आहे. या ग्रहाचा शोध म्हणजे पृथ्वीसारख्या जगताचा शोध लावण्याच्या दिशेने पडलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ‘प्रॉक्सिमा बी’वर जीवसृष्टी आहे का, हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांना या ग्रहाचे छायाचित्र घ्यावे लागणार आहे. हा ग्रह एवढा जवळ आहे की, एक दिवस यंत्रमानवही त्यावर पोहोचू शकेल. तथापि, येत्या काही शतकांपर्यंत दुसऱ्या सौरमालिकेतील ग्रहांची अंतराळ मोहीम हाती घेण्याएवढे तंत्रज्ञान विकसित होऊ शकणार नाही.