नवी दिल्ली : बेकार टायर पर्यावरणासाठी धोकादायक असतात; पण जपानी विद्यापीठात काम करणाऱ्या एका भारतीय प्राध्यापकाने भूकंपाचा धोका कमी करण्यासाठी हे टायर उपयोगी ठरतात असा दावा केला असून, या टायरचा वापर करणे म्हणजे अगदी कमी खर्चात भूकंपाची तीव्रता कमी करण्यचे परिणामकारक साधन हाताशी येणे ठरेल, असा दावा केला आहे. जपानच्या फुकुओका क्युशू विद्यापीठाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेले प्राध्यापक हेमंत हजारिका यांनी हा दावा केला आहे. हजारिका मूळ आसाममधील जोरहाटचे रहिवासी आहेत. भिंतीच्या पायात टायर बसविण्याचे तंत्र जगात कोठेही वापरता येईल, विशेषत्वाने आशियात वापरता येईल, असे हेमंत हजारिका (४७) म्हणतात. याच धर्तीचे आणखी एक तंत्र हजारिका यांचा गट विकसित करीत असून, त्याअंतर्गत वापरलेल्या बेकार टायरचा चुरा व वाळू यांचे मिश्रण इमारतीच्या पायात घातले जाणार आहे. हे तंत्रज्ञान विकासाच्या अखेरच्या टप्प्यात आहे.
खराब टायर वापरल्यास भूकंपाचा धोका कमी
By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST