शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मालीतील ओलीसनाट्य संपुष्टात

By admin | Updated: November 21, 2015 04:29 IST

पश्चिम आफ्रिकेतील माली देशाची राजधानी बमाको येथील रेडिसन ब्लू या लक्झरी हॉटेलात दोन बंदूकधारी ‘जिहादी’ अतिरेक्यांनी आरंभलेले ओलीसनाट्य शुक्रवारी रात्री उशिरा संपुष्टात आले.

बमाको : पश्चिम आफ्रिकेतील माली देशाची राजधानी बमाको येथील रेडिसन ब्लू या लक्झरी हॉटेलात दोन बंदूकधारी ‘जिहादी’ अतिरेक्यांनी आरंभलेले ओलीसनाट्य शुक्रवारी रात्री उशिरा संपुष्टात आले. यात १८ जणांचा बळी गेला. २० भारतीयांसह सर्व ओलिसांची सुरक्षितपणे मुक्तता केल्यानंतर सुरक्षा दलांनी धडक कारवाई करीत दोन्ही अतिरेक्यांचा खातमा केला.सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी १२.३० वाजता दोन सशस्त्र अतिरेकी हॉटेलात दाखल झाले. त्यांनी हॉटेलात अंदाधुंद गोळीबार करीत तेथे असलेल्यांना ओलीस ठेवले. हा आकडा १७० असल्याचे रेडिसन ब्लू हॉटेल शृंखलेचे मालक ‘रेजिडोर हॉटेल ग्रुप’ने घटनेनंतर लगेच स्पष्ट केले. अतिरेकी हॉटेलमध्ये घुसताच काही क्षणांतच माली सुरक्षा दलाने हॉटेलला घेरले. यानंतर संयुक्त राष्ट्राची ‘मिनुसमा’ शांतता सुरक्षा दल तसेच फ्रान्सच्या ‘गिग्न’शाखेचा सुमारे ४० निमलष्करी पोलिसांचा विशेष सुरक्षा दस्ताही घटनास्थळी दाखल झाला. या सुरक्षा दलांनी संयुक्तपणे धडक कारवाई करीत सर्व ओलिसांची सुरक्षित सुटका केली. प्रारंभी अतिरेक्यांनी तीन ओलिसांना ठार केल्याचे वृत्त आले. मात्र हॉटेलमध्ये १८ जणांचे मृतदेह आढळून आल्याचे एका वृत्तसंस्थेने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सांगितले. या हल्ल्यात तीन सुरक्षारक्षक जखमी झाले असून त्यांच्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. अद्याप कुठल्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. एक वरिष्ठ सुरक्षा सूत्र व हॉटेलच्या आॅपरेटरने सांगितले की, बंदुकधाऱ्यांनी हॉटेलला लक्ष्य केले. हे हॉटेल सरकारी मंत्रालये आणि राजनयिक कार्यालयांनजीक आहे. अनेक तासांच्या सुरक्षा अभियानानंतर रात्री उशिरा ‘रेजिडोर हॉटेल ग्रूप’ने लंडनमधून निवेदन जारी करून अद्यापही आमचे १२५ पाहुणे व १३ कर्मचारी अतिरेक्यांच्या तावडीत असल्याचे स्पष्ट केले. यानंतर काहीच तासांतच सर्व ओलिसांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे मालीच्या सुरक्षा मंत्र्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी आॅगस्टमध्ये मध्य मालीच्या सेवेरे शहरातही अशीच घटना घडली होती. यात सुमारे २४ तास बंदी बनवून ठेवल्यानंतर अतिरेक्यांनी या सर्व बंदींना दुसऱ्या हॉटेलात नेले होते. या घटनेत चार जवान, पाच संयुक्त राष्ट्राच्या कर्मचाऱ्यांसह पाच हल्लेखोरांचा मृत्यू झाला होता.मुंबईसारखा आठवडाभरात दुसरा हल्ला मुंबई हल्ल्यासारखा आठवडाभरात हा दुसरा अतिरेकी हल्ला आहे. गेल्या शनिवारी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे अशाच अतिरेकी हल्ल्यात १३२ निष्पापांचा बळी गेला होता. २००८ मध्ये मुंबईत दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी दोन हॉटेलांमध्ये केलेल्या नरसंहारात १६४ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते....आणि भारतीयांची सुटका : ‘जिहादीं’नी हॉटेलात बंदी बनवून ठेवलेल्यांमध्ये २० भारतीयांचा समावेश होता. हे भारतीय दुबईच्या एका कंपनीत काम करीत होते. रात्री उशिरा या सर्वांची सुरक्षित सुटका करण्यात आल्याचे वृत्त भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिले. कुराणातील ‘आयत’ ऐकवल्यावर सोडलेहल्लेखोरांनी ओलिसांना कुराणातील ‘आयत’ म्हणायला सांगितले. काही ओलिसांनी कुराणातील ‘आयत’ ऐकवल्यावर त्यांना सोडून देण्यात आले.असा केला प्रवेशसुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदूकधारी हल्लेखोर ‘जिहादी’ आहेत. डिप्लोमॅटिक प्लेट्स लावलेल्या गाडीतून ते आले. त्यामुळे हॉटेलात त्यांना सहज प्रवेश मिळाला. त्यानंतर अतिरेक्यांनी १९० खोल्यांच्या या हॉटेलच्या सातव्या माळ्यावर अंदाधुंद गोळीबार केला.