बाटिंग (मलेशिया) : मलेशियात एक नाव समुद्रात बुडाल्याने दोन जण मृत्युमुखी पडले, तर ३७ जण अद्यापही बेपत्ता आहेत. या नावेत रमजानसाठी घरी परतत असलेले अवैध इंडोनेशियन प्रवासी होते. क्षमतेहून अधिक प्रवासी असल्याने नाव बुडाल्याचे सांगण्यात येते. मलेशियातील सर्वात मोठे बंदर क्लांगजवळ मध्यरात्री ही दुर्घटना झाली. नावेतील ५८ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली किंवा ते स्वत: पोहत किनाऱ्यावर आले. बचाव कर्मचाऱ्यांना दोन मृतदेह सापडले आहेत. मात्र, ३७ प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत.
समुद्रात नाव बुडून, मलेशियात ३७ बेपत्ता
By admin | Updated: June 19, 2014 04:13 IST