शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

65 वर्षांच्या आजीला व्हिसासाठी मुलाखत द्यावी लागेल का?

By admin | Updated: June 26, 2017 07:38 IST

माझ्या 65 वर्षांच्या आजीला व्हिसासाठी अर्ज करायचा आहे. पण ती व्हीलचेअरवर असते. तिला मुलाखतीसाठी यावं लागेल का?

प्रश्न - माझ्या 65 वर्षांच्या आजीला व्हिसासाठी अर्ज करायचा आहे. पण ती व्हीलचेअरवर असते. तिला मुलाखतीसाठी यावं लागेल का?
 
उत्तर - होय, तुमच्या आजीला मुलाखतीसाठी यावं लागेल. बहुतेक सगळ्या प्रकरणांमध्ये व्हिसाची प्रक्रिया अनिवार्य असते. वृद्ध व्यक्ती अथवा अपंग व्यक्तिंकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे तुमच्या आजीची अथवा कुठल्याही वृद्ध अथवा अपंग व्यक्तिची व्हिसा मुलाखतीची प्रक्रिया सुरळित व्हावी यासाठी कॉन्सुलेटचे कर्मचारी मदत करतील. कॉन्सुलेटमध्ये व्हीलचेअर नेण्याची सुविधा आहे. आणि कॉन्सुलेटचे कर्मचारीही आवश्यक तिथे व्हीलचेअरची सुविधा देतील.
 
तुमच्या आजीला सोबतीची गरज असेल तर तिच्यासह कुटुंबातील सदस्यही मुलाखतीच्यावेळी येऊ शकतात. जर आजीसोबत कुणी नातेवाईक येऊ शकत नसतील तरी हरकत नाही. आम्ही गुजराती, मराठी आणि हिंदी भाषेतून संवाद साधता येणारी व्यवस्था करतो आणि मुलाखत नीट पार पडेल याची काळजी घेतो.
 
 
अर्थात, याबाबतीत काही अपवाद आहेत. नॉनइमिग्रंट व्हिसासाठी 79 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तिंनी किंवा 14 वर्षांपेक्षा लहान मुलांनी अर्ज केला असेल तर व्यक्तिगत मुलाखतीत सूट मिळू शकते. वैध व्हिसाचे किंवा एक वर्षापेक्षा कमी कालावधीत बाद झालेल्या व्हिसाचे नूतनीकरण करतानाही अर्जदाराला मुलाखत न देऊन चालू शकते. मुलाखत कधी अनिवार्य आहे आणि कधी टाळता येऊ शकते याबाबत www.ustraveldocs.com/in या वेबसाईटवर सविस्तर माहिती दिलेली आहे. मात्र, इमिग्रंट किंवा स्थलांतरीताच्या व्हिसासाठी सगळ्या अर्जदारांना मुलाखत ही अनिवार्य आहे.
 
आणखी वाचा...
 
USचा स्टूडंट व्हिसा आहे, पण प्लॅन बदलला तर काय करायचं?
 
 
माझी मुलाखतीची तारीख बदलता येईल का?
 
अमेरिकी नागरिकाशी लग्न केल्यावर व्हिसाचं काय?
 
 
US व्हिसा मुलाखतीच्या आधी बोटाचे ठसे घेतात का?