शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

करा नाहीतर मरा, बगदादीचा निर्वाणीचा आदेश

By admin | Updated: March 2, 2017 15:01 IST

दहशतवादी संघटना इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीने इराकमध्ये पराभव मान्य केला

ऑनलाइन लोकमत
काहिरा, दि. 2 - दहशतवादी संघटना इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीने इराकमध्ये पराभव मान्य केला आहे.  संघटनेत आलेल्या दहशतवाद्यांना आपल्या देशात परत जा नाहीतर स्वतःला बॉम्बने उडवून आत्मघाती हल्ला करा असा आदेश बगदादीने दिला आहे.  
 
इराकी मीडियामधील वृत्तांनुसार, इराकच्या मोसूल शहरामध्ये इराकी आणि अमेरिकेच्या सैनिकांनी घेरल्याने बगदादी निराश झालाय. समारोप भाषणामध्ये त्याने आपल्या दहशतवाद्यांना आपल्या देशात परत जा नाहीतर स्वतःला बॉम्बने उडवून आत्मघाती हल्ला करा असा आदेश दिला आहे. त्याचं हे भाषणं रेकॉर्ड करण्यात आलं आसून इतर ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांनाही ते एकवण्यात येणार आहे. 
 
रिपोर्ट नुसार, मोसूलमध्ये इराकी लष्कराचा ताबा पुन:प्रस्थापीत होत असल्याचं पाहून बगदादीच्या संघटनेचे कमांडर सीरिया आणि इराकच्या  सीमेकडे पळण्याचा प्रयत्न करत आहेत. 19 फेब्रुवारीला लष्कराने पश्चिम मोसूलला स्वतंत्र करण्यासाठी नवी रणनिती आखून हल्ले करायला सुरूवात केली आहे.  जानेवारी महिन्यात इराक सरकारने 3 महिन्यांच्या लढाईनंतर मोसूलवर ताबा मिळवल्याचं जाहीर केलं होतं.