शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

काश्मीर प्रकरणाला अफगाणिस्तानशी जोडू नका, अमेरिकेनं पाकला फटकारले

By admin | Updated: October 13, 2016 10:24 IST

भारताची कोंडी करण्यासाठी काश्मीरचा मुद्दा अफगाणिस्तानातील शांतता ठरावाशी जोडण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तानला अमेरिकेने पुन्हा फटकारले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.13- भारताची कोंडी करण्यासाठी काश्मीरचा मुद्दा अफगाणिस्तानातील शांतता ठरावाशी जोडण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तानला अमेरिकेने पुन्हा फटकारले आहे. तसेच भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचेही अमेरिकेने समर्थन केले आहे. उरी येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन दिलेले प्रत्युत्तर हे आत्मसंरक्षण अधिकारांतर्गत येते, असे म्हणत अमेरिकेने कारवाईला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच या वर्षाअखेरपर्यंत भारताला एनएसजीचे ( Nuclear Suppliers Group ) सदस्यत्व मिळेल, यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत, असेही व्हाईट हाऊसचे दक्षिण एशियाचे प्रभारी पीटर लावॉय यांनी स्पष्ट केले आहे. 
 
उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. तसेच भारताविरुद्ध वारंवार दहशतवादी कारवाया करणा-या पाकिस्तानला अद्दल घडावी, यासाठी भारताकडून पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटे पाडण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळेच बिथरलेल्या पाकिस्तानकडून आता भारताविरोधात कटकारस्थान रचले जात आहेत, याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानने अमेरिकेकडे काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. 
 
आणखी बातम्या
बलुचिस्तानचा विषय सोडा अन्यथा आम्ही खलिस्तानचा मुद्दा जिवंत करु - पाकिस्तान
तर सर्जिकल स्ट्राईकला चोख प्रत्युत्तर दिले असते - अब्दुल बासित
 
याचसदर्भात, गेल्या आठवड्यात लावॉय यांची पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेत नेमलेल्या दोन विशेष राजदूतांनी भेट घेतली होती. यावेळी त्यांनी काश्मीरप्रश्नी अमेरिकेने हस्तक्षेप करावा यासाठी या अफगाणिस्तानचा दाखला दिला. 'काश्मीर प्रश्नावर तोडगा निघाल्याशिवाय या भागात शांतता नांदणार नाही. तसेच अफगाणिस्तानमधील शांततेचा मार्गही काश्मीरमधून जातो हे अमेरिकेने ध्यानात घ्यावे', असा इशारा त्यांनी दिला होता. याच मुद्यावरुन काश्मीर प्रकरणाला अफगाणिस्तानशी जोडू नका, असे सांगत अमेरिकेने पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे.