शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मांडातील रहस्यांचा नासा करणार खुलासा

By admin | Updated: February 22, 2017 20:49 IST

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने सौरमंडळाच्या बाहेरील ब्रह्मांडाशी संबंधित रहस्यांचा उलगडा करण्याचे संकेत दिले आहेत

ऑनलाइन लोकमतन्यू यॉर्क, दि. 22 - अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने सौरमंडळाच्या बाहेरील ब्रह्मांडाशी संबंधित रहस्यांचा उलगडा करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी नासानं आज (अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार) दुपारी 1 वाजता न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेचंही आयोजन केलं आहे. नासानं एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. या प्रसिद्धी पत्रकात सूर्य आणि अन्य ता-यांच्या भ्रमणासंबंधी एक्सोप्लॅनेटशी संबंधित रोमांचक माहिती देण्यात आली आहे.प्रसिद्धी पत्रकात सूर्य आणि दुस-या ता-यांसंबंधी नवी माहिती देण्यात येणार आहे. नासाच्या हा कार्यक्रम लाइव्ह दाखवण्यात येणार असून, नासाच्या वेबसाइटवरही या कार्यक्रमाची लाइव्ह माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे नासाच्या या कार्यक्रमात खगोल वैज्ञानिक आणि अवकाश संशोधक भाग घेणार आहेत. या लाइव्ह कार्यक्रमादरम्यान #AskNasa  हे हॅशटॅग वापरून त्यांना प्रश्नही विचारता येणार आहेत. पत्रकार परिषदेनंतर नासा रेडिट AMA(आस्क मी एनिथिंग)चंही आयोजन करणार आहे. यात प्रश्न विचारण्यात आलेल्या लोकांना उत्तरंही मिळणार आहेत. नासाच्या वैज्ञानिकांनी आतापर्यंत 114 ग्रहांचा शोध लावला आहे. त्यातील काही ग्रहांवर जीवन आणि एलियनच्या अस्तित्वासंबंधीही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेत आज या रहस्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.