शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप कुमार यांचे पिढीजात घर कोसळले

By admin | Updated: June 17, 2017 00:11 IST

प्रख्यात बॉलीवूड अभिनेते दिलीप कुमार यांचे येथील वडिलोपार्जित जुने घर कोसळले. ते मोडकळीस आले होते. या घराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.

पेशावर : प्रख्यात बॉलीवूड अभिनेते दिलीप कुमार यांचे येथील वडिलोपार्जित जुने घर कोसळले. ते मोडकळीस आले होते. या घराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.ऐतिहासिक क्विस्सा खवानी बाजाराजवळील मोहल्ला खुदा दाद भागात असलेल्या या घराचा आता केवळ दर्शनी भाग आणि दरवाजा तेवढा शाबूत आहे, असे सांस्कृतिक वारसा परिषदेचे सरचिटणीस शकील वहिदुल्ला यांनी सांगितले. पाकच्या पुरातत्त्व विभागाने २०१४ मध्ये या घराला राष्ट्रीय वारसा घोषित केले होते. याउपरही त्याच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल शहरातील प्रतिष्ठित मंडळींनी खैबर पख्तुनख्वा प्रांत सरकारवर टीका केली आहे. या घराच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी मी राज्य सरकारला सहा अर्ज दिले; परंतु कोणतेही पाऊल उचलले गेले नाही, असे वहिदुल्ला यांनी सांगितले. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांना घराच्या अवस्थेबद्दल माहिती देण्यात आल्याने त्या हताश झाल्या, पण आम्ही घराची पुनर्बांधणी करणे शक्य होणार आहे. हे घर खिळखिळे झाले होते. त्यामुळे त्याचे संवर्धन शक्य नव्हते, असे पुरातत्व विभागाने सांगितले. या घराची पुनर्बांधणी करणे हाच त्याचे संवर्धन करण्याचा एकमेव मार्ग होता. या घराच्या पुनर्बांधणीसाठी पुरातत्त्व विभागाला ते जमीनदोस्त करावे लागणार होते. दिलीप कुमार यांच्यासह अनेक बॉलीवूड तारे मूळचे पेशावरचे आहेत. त्यात कपूर परिवार, शाहरुख खान, दिवंगत विनोद खन्ना यांचा समावेश आहे. या सर्वांची पिढीजात घरे शहरात आजही अस्तित्वात आहेत. दिलीप कुमार यांचा मोहल्ला खुदा दाद येथे १९२२ मध्ये जन्म झाला होता. (वृत्तसंस्था)- या घराचे मालकी हक्क एका व्यक्तीकडे असून, कोर्टकज्ज्यांमुळे त्याच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना खीळ बसलेली होती. तथापि, नव्या कायद्यामुळे पुरातत्त्व विभागाला प्राचीन महत्त्वाच्या ठिकाणी मालकी हक्क नसतानाही संवर्धन आणि पुनर्बांधणी करण्याची मोकळीक आहे.