शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
3
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
4
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
5
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
6
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
7
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
8
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
9
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
10
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
11
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
12
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
13
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
14
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
15
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
16
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
17
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
18
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
19
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
20
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!

खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 19:31 IST

नॉस्ट्रॅडॅमस यांनी १५५५ मध्ये लिहिलेल्या "लेस प्रोफेसीज" नावाच्या पुस्तकात कवितांच्या सहाय्याने अनेक प्रमुख घटनांसंदर्भात भाकीते वर्तवली आहेत.

फ्रेंच अ‍ॅस्ट्रोलॉजर नॉस्ट्रॅडॅमसची यांनी वर्तवलेली भाकीतं आजही लोकांना आश्चर्य चकित करतात. नॉस्ट्रॅडॅमस यांनी १५५५ मध्ये लिहिलेल्या "लेस प्रोफेसीज" नावाच्या पुस्तकात कवितांच्या सहाय्याने अनेक प्रमुख घटनांसंदर्भात भाकीते वर्तवली आहेत. यात, लंडनची आग, हिटलरचा उदय, अमेरिकेत झालेला ११ सप्टेंबरचा हल्ला आणि कोविड-१९ महामारीचा समावेश होतो. यातच आता, नॉस्टॅडॅमस यांनी त्यांच्या पुस्तकात पोप फ्रान्सिस यांचा मृत्यूसंदर्भात आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भातही भविष्यवाणी केल्याची चर्चा सुरू आहे.

पोप फ्रान्सिस यांचा मृत्यू -कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. व्हॅटिकनने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आज सकाळी ७:३५ वाजता अखेरचा श्वास घेतला. १४ फेब्रुवारी रोजी त्यांना रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर न्यूमोनिया आणि अॅनिमियाचा उपचार सुरू होता. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे ते सुमारे ५ आठवडे रुग्णालयात दाखल होते. दरम्यान, त्यांच्या मृत्यूनंतर, आता नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. यात, एका जुन्या पोंटिफ (चर्च प्रमुख) च्या मृत्यूचा आणि नवीन नेत्याच्या आगमनाचा उल्लेख करण्यात आला आहे.

नॉस्ट्रॅडॅमसनं केली होती अशी भविष्यवाणी -"एका अत्यंत वृद्ध पोपच्या मृत्यूनंतर, एक कमी वयाचा रोमन (पदासाठी) निवडला जाईल. लोक म्हणतील की, तो आपली गादी कमकुवत करत आहे. मात्र तो अविरतपणे पुढे जात  राहील," असे नॉस्ट्रॅडॅमसने एक भविष्यवाणीत म्हटले आहे. 

नॉस्ट्रॅडॅमस पुढे म्हणाला, "पवित्र रोमन चर्चच्या अखेरच्या छळादरम्यान एक रोमन पीटर गादीवर येईल. तो अनेक संघर्षांमध्ये आपल्या लोकांना सहभागी करेल आणि जेव्हा हे सर्व संपुष्टात येईल, तेव्हा सात टेकड्यांचे शहर नष्ट होईल आणि भयंकर न्यायाधीश आपल्या लोकांचा न्याय करतील."

 

टॅग्स :Popeपोप