शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

डायबेटिसच्या रुग्णांना आता ‘कोयी’च्या भावात ‘आंबे’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 18:01 IST

जगातलं सर्वांत मोठं संशोधन! ‘गेमचेंजर’ म्हणून जगभरातील रुग्णांसाठी उपयोगी ठरणार!

- मयूर पठाडे‘आम तो आम, गुठलीयों के भी दाम’.. अशी एक म्हण आहे. ‘आंब्यां’बरोबरच त्यांची ‘कोय’देखील आपलं उखळ कधीकधी कसं पांढरं करते याचा अनुभव आपणही घेतला असेल. प्रत्येकासाठीचा हा ‘आंबा’ आणि ही ‘कोय’ मात्र प्रत्येकवेळी वेगवेगळी असते. याच म्हणीचा प्रत्यय आता आरोग्याच्या क्षेत्रातही आला आहे आणि डायबेटिसच्या रुग्णांसाठी आता ‘कोयी’च्या भावात ‘आंबे’ मिळणार आहेत!जगातलं सर्वात मोठं म्हणता येईल असं एक संशोधन नुकतंच अमेरिकेत करण्यात आलं आणि सॅन दिएगो इथल्या कॉन्फरन्समध्ये ते मांडण्यातही आलं. तब्बल तीस देशांतल्या दहा हजार पेशंटवर काही चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून शास्त्रज्ञांच्या हाती अतिशय विलक्षण अशी माहिती आली आहे. डायबेटिसच्या रुग्णांसाठी स्वस्तातली बरीच औषधं मिळतात. ज्यांची किंमत फार नाही. कॅनॉग्लिफ्लोझीनसारखी ही औषधं आता एकाच गोळीत अनेक शिकार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. हा अभ्यास आरोग्याच्या क्षेत्रात ‘गेमचेंजर’ म्हणून जगभरातील रुग्णांसाठी उपयोगी ठरेल असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ञांनी व्यक्त केला आहे. काय आहे या संशोधनाचा फायदा?

 

१-टाइप टू प्रकारच्या डायबेटिससाठी घेतली जाणारी ही औषधं हृदयविकाराच्या धोक्यापासूनही रुग्णांना वाचवू शकतात.२- किडनी विकारांपासूनही औषधं रुग्णांचं संरक्षण करतात.३- डायबेटिस अनेक आजारांचं माहेरघर आहे. डायबेटिसमुळे किडनी विकारांची शक्यताही मोठ्या प्रमाणात वाढवते, पण डायबेटिसवरची ही औषधं किडनीविकारांची क्षमता तब्बल चाळीस टक्क्यांनी कमी करतात.४- डायबेटिसचे रुग्ण अनेकदा हृदयविकाराला बळी पडतात आणि त्यातच त्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाणही जगभरात खूपच अधिक आहे. डायबेटिसवरची ही औषधं हृदयविकाराची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात कमी करतात. एवढंच नाही, हार्ट अटॅकची शक्यताही त्यामुळे १४ टक्क्यांनी कमी होते.

 

‘इनवोकाना’ या बॅ्रंडनेमखाली विकल्या जाणाऱ्या डायबेटिसच्या औषधांमुळे हार्ट अटॅकची शक्यता तीस टक्क्यांनी कमी होते असंही संशोधकांना आढळून आलं. ‘आम तो आम, गुठलीयों के भी दाम’ ज्याला म्हणतात ते हे!या नव्या संशोधनानं एकाच तीरात असे अनेक पक्षी मारले आहेत.रुग्णांसाठी ही आनंदाची आणि महत्त्वाची घटना आहेच, पण त्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही या संशोधकांनी दिला आहे.