शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सीमावाद लवकर सोडविण्याचा निर्धार

By admin | Updated: May 16, 2015 02:19 IST

: भारत व चीन यांच्यातील सीमावादावर राजकीय तोडगा काढून हा वाद लवकरात लवकर मिटवावा असा निर्धार भारत व चीन यांनी आज केला.

बीजिंग : भारत व चीन यांच्यातील सीमावादावर राजकीय तोडगा काढून हा वाद लवकरात लवकर मिटवावा असा निर्धार भारत व चीन यांनी आज केला. सीमावाद संपल्यास भारत व चीन यांच्यातील संबंधांना नवे वळण मिळेल व इतर कोणतेही नवे अडसर निर्माण होणार नाहीत, असे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले. मोदी व चीनचे पंतप्रधान ली यांच्यात आज चर्चा झाली. चीनने भारत व चीन यांच्यातील प्रत्यक्ष ताबारेषेची (एलएसी- लाईन आॅफ अ‍ॅक्चुअल कंट्रोल) कल्पना स्पष्ट करावी, सीमावादावर कोणताही पूर्वग्रह वा आपल्या पदाचा विचार न करता निर्णय घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. अनिश्चिततेमुळे सीमाभागात संवेदनशील तणाव निर्माण होत आहे. या भागातील गावात कोठे एलएसी आहे याची माहिती दोन्ही बाजूच्या लोकांना माहीत नाही, असे मोदी म्हणाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. सीमावाद, व्यापारी तूट, दहशतवाद, गुंतवणूक, हवामानातील बदल व संयुक्त राष्ट्रातील सुधारणा या मुद्यांचा समावेश त्यांच्या ९० मिनिटांतील चर्चेत होता. या चर्चेनंतर एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. गेल्या काही दशकांपासून भारत व चीन यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. या संबंधांना चांगले वळण देणे ही दोन्ही देशांची ऐतिहासिक जबाबदारी आहे, असे मोदी याप्रसंगी बोलताना म्हणाले. आपल्याला सहकार्यातील शक्तीची जाणीव व्हायची असेल, तर आपल्यातील गैरसमज, अविश्वास असणाऱ्या बाबींवरही चर्चा झाली पाहिजे, असे मोदी म्हणाले. भारत व चीन यांच्या संबंधात काही मतभेद आहेत हे आम्ही नाकारत नाही, पण यावर चर्चा करण्यासाठी यंत्रणा आहे. तोडगा काढण्यासाठी पुरेशी राजकीय परिपक्वता आहे. दोन्ही देशांनी शांतता व पारदर्शकता ठेवावी, असे यावेळी चीनचे पंतप्रधान ली यांनी सांगितले. नाते जुळले पाहिजे आपण आपल्यातील सीमावाद आधी सोडविला पाहिजे. हा आपला ऐतिहासिक वारसा आहे हे दोन्हीही देशांना माहीत आहे. आपली जबाबदारी ओळखून दोन्ही देशांनी ती पार पाडली पाहिजे व नव्या निर्धाराने पुढे गेले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी त्सिंगुआ विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर बोलताना म्हणाले. आपण सीमावादावर जो तोडगा काढू त्याने केवळ सीमेची समस्या सुटली असे होता कामा नये, त्या तोडग्याने आपले नाते बदलले पाहिजे, असे मोदी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.