शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

युनियन कार्बाईडवर खटल्यास नकार

By admin | Updated: August 2, 2014 03:39 IST

भोपाळ गॅस दुर्घटनेतील मुख्य दोषी असलेल्या युनियन कार्बाईड कॉर्पोरेशनवर येथील रासायनिक कारखान्यातून पसरलेल्या प्रदूषणासाठी खटला चालवला जाऊ शकत नसल्याचा निकाल दिला आहे.

न्यूयॉर्क : भोपाळ गॅस दुर्घटनेतील मुख्य दोषी असलेल्या युनियन कार्बाईड कॉर्पोरेशनवर येथील रासायनिक कारखान्यातून पसरलेल्या प्रदूषणासाठी खटला चालवला जाऊ शकत नसल्याचा निकाल दिला आहे. अमेरिकी न्यायालयाचा हा निकाल १९८४ साली घडलेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.स्वयंसेवी संस्था अर्थराईट्स इंटरनॅशनलने भोपाळ पीडितांमार्फत न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायालयात एक याचिका केली होती. यात नागरिकांची जमीन आणि पाणी कारखान्यातून पसरलेल्या प्रदूषणामुळे वापरण्यायोग्य नसल्याचा दावा करण्यात आला होता. संघटनेच्या मते, कारखान्याच्या उभारणीचे काम कंपनीच्या एका कर्मचाऱ्याच्या हातात होते, हा पुरावा दिल्यानंतरही न्यायालयाने कार्बाईडविरोधात खटला चालवला जाऊ शकत नसल्याचा निकाल दिला.जिल्हा न्यायालयाने दिलेला हा त्रुटीपूर्ण निर्णय ठोस पुराव्यामुळे अपिलात बदलेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला. याचिकेत मध्यप्रदेश सरकारलाही प्रतिवादी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारकडे कारखाना स्थळाच्या साफ-सफाईत मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे.जिल्हा न्यायाधीश जॉन केनान यांनी दिलेल्या ४५ पानी निकालात मध्यप्रदेश सरकारला घटनास्थळाच्या स्वच्छतेसाठी संपूर्ण साहाय्य करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळी अमेरिकी युनियन कार्बाईड कंपनीविरोधात खटला चालवण्यास नकार दिला आहे. (वृत्तसंस्था)