शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बायडेन यांनी शपथ घेताच पोर्टलंडमध्ये डेमोक्रेटिकच्या मुख्यालयाची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 13:40 IST

Joe Biden News: आंदोलकांना बुधवारी (भारतीय गुरुवार) डेमोक्रेटिक पार्टीच्या स्थानिक मुख्यालयात घुसून तोडफोड केली. तसेच इमारतीच्या काचा फोडल्या. सिएटलमध्ये काही जणांना अटकही करण्यात आली.

पोर्टलंड : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ जो बायडेन यांनी घेतली खरी परंतू त्यांच्या समोर मोठी आव्हाने आहेत. बायडेन यांनी शपथ घेताच काही तासांत आंदोलकांना गोंधळ घातला. तसेच बायडेन यांचा पक्ष डेमोक्रेटिकच्या मुख्यालयाची तोडफोड केली आहे. आंदोलकांनी पोलिसांविरोधात फॅसिस्टवादी नरसंहाराच्या घोषणा दिल्या. 

आंदोलकांना बुधवारी (भारतीय गुरुवार) डेमोक्रेटिक पार्टीच्या स्थानिक मुख्यालयात घुसून तोडफोड केली. तसेच इमारतीच्या काचा फोडल्या. सिएटलमध्ये काही जणांना अटकही करण्यात आली. आंदोलक बदल्याची भावना व्यक्त करत होते. यानंतर ते हिंसक झाले. पोर्टलँड पोलिसांनी सांगितले की, हिंसक झालेल्या आठ लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये गुन्हेगारी कृत्य, विध्वंसक उपकरणे बाळगणे आणि आग लावणे असे गुन्हे करण्यात आले आहेत. 

डेमोक्रेटिक पार्टी ऑफ ओरेगनने जारी केलेल्या वक्तव्यानुसार पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करण्याची ही पहिली वेळ नाहीय. गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या कार्यालयांची अशीच तोडफोड करण्यात आली आहे. मागे झालेल्या घटनांनंतरही आम्ही महत्वाचे काम केले आहे. अशा कोणत्याही घटना आम्हाला काम करण्यापासून रोखू शकत नाहीत. 

पोलिसांनी केलेल्या हत्यांविरोधात 200 आंदोलकांनी पोलीस विरोधी नारेबाजी केली. तसेच पोर्टलंडच्या रस्त्यांवर उतरले. यावेळी त्यांच्या हाती We don't want Biden-We want Revenge, म्हणजेच आम्हाला बायडेन नकोयत, आम्हाला बदला हवाय, अशा घोषणा देत पोस्टर झळकावले. यावेळी आंदोलकांनी स्थानिक मुख्यालयाच्या खिडक्यांची तावदाने फोडली. तसेच ICE संपवावा, आम्हाला पोलीस नको आहेत, तुरुंगही नकोत, सीमा संपवा, राष्ट्राध्यक्ष नकोय, अशी घोषणाबाजी केली. 

बायडेन यांनी शब्द पाळला...

कोरोनामुळे मरगळलेली अर्थव्यवस्था, कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे वाढत चाललेली मृतांची संख्या, कॅपिटॉल हिलवर अलीकडेच झालेला हल्ला, अशी चारही बाजूंनी निराशाजनक परिस्थिती असताना व्हाइट हाउसच्या प्रांगणात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या वेळी असंख्य मान्यवर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सोहळ्याला पाठ दाखवली. मात्र, मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताच बायडेन यांनी कामालाही सुरूवात केली. तसंच बायडेन यांनी निवडणुकांपूर्वी दिलेला शब्दही पाळला.बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले काही निर्णय मागे घेतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी घेतलेले काही निर्णय मागे घेतले. निवडणुकांदरम्यान बायडेन यांनी दिलेल्या आश्वासनांची आणि मोठ्या कालावधीपासून सुरू असलेल्या अमेरिकेतील मागण्यांवर बायडेन यांनी स्वाक्षरी केली. 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिका