शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

लोकशाही मानणा-यांना संपवलेच पाहिजे - आयएस

By admin | Updated: December 23, 2014 08:34 IST

लोकशाही मानणा-या सर्वांना संपवलेच पाहिजे अशी आयएस या दहशतवादी संघटनेची धारणा आहे, असे जर्मन पत्रकार जुर्गेन टोडनहोफर यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. २२ -लोकशाही मानणा-या सर्वांना संपवलेच पाहिजे अशी आयएस या दहशतवादी संघटनेची धारणा आहे, असे जर्मन पत्रकार जुर्गेन टोडनहोफर यांनी म्हटले आहे. इराक व सीरियात सक्रिय असलेली दहशतवादी संघटना असलेल्या 'आयएस'च्या क्षेत्रात प्रवेश करून तेथे दहा दिवस घालवणारे टोडनहोफर हे पहिले पत्रकार आहेत. पश्चिमी राष्ट्रांच्या कल्पनेपेक्षा आयएस अधिक शक्तिशाली व  धोकादायक बनल्याचे त्यांनी नमूद केले आहे. टोडनहोफर यांनी तेथे घालवलेल्या दिवसांबद्दलचा आपला अनुभव ' १० डेज इन इस्लामिक स्टेट' या रिपोर्टमध्ये मांडला असून आयएसची विचारसरणी, त्यांचे राहणीमान, त्यांची कार्यपद्धती अशा अनेक विषयांवर त्यांनी लिहीले आहे. 
ज्या अमेरिकन पत्रकाराचा ( जेम्स फॉली) आयएसच्या दहशतवाद्यांनी शिरच्छेद केला होता, तो जेथे राहत होत, त्याच हॉटेलमध्ये टोडनहोफही राहिले होते. मी तो (शिरच्छेदाचा ) व्हिडीओ पाहिला होता आणि तसं काही माझ्यासोबत होऊ नये अशीच प्रार्थना मी करत होतो, असे टोडनहोफ म्हणाले.
'आयएस'ने कब्जा केलेला परिसर अतिशय विशाल असून जगाच्या कानाकोप-यातून दररोज शेकडो तरूण या संघटनेत सहभागी होण्यासाठी येत असतात. मोसूलमध्ये ५ हजारांहून अधिक तरूण असून ते सर्वत्र विखुरलेले आहेत व तेथील स्थानिकांचा त्यांना पाठिंबा आहे. लष्करी कारवाई किंवा हवाई हल्ले करून त्यांचा खात्मा करण्याचा प्रयत्न केला तर अख्खे शहरच जमीनदोस्त होईल. त्या भूमीवर पडलेल्या प्रत्येक बॉम्बमुळे व जखमी झालेल्या प्रत्येक नागरिकामुळे दहशतवाद्यांची संख्या वाढत जाते, असे टोडनहोफ यांनी म्हटले आहे. 
संपूर्ण जगावर कब्जा करणे तसेच लोकशाही मानणा-या सर्वांना संपवणे हाच आयएसचा समज असल्याचे तेथील वातावरण पाहून स्पष्ट होत असल्याचे टोडनहोफ यांनी नमूद केले आहे. मात्र मोझेस, जिजस आणि मोहम्मदला मानत असल्याने ज्यू व ख्रिश्चन धर्मीयांचे प्राण मात्र वाचतील, असेही टोडनहोफ यांनी म्हटले आहे.  मात्र इतर सर्व धर्मीयांना मारले पाहिजे, अशी त्यांची धारणा असल्याचे टोडनहोफ यांनी नमूद केले आहे.