मक्का : ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हज यात्रेत चेंगराचेंगरी झाली त्यांना या दुर्घटनेसाठी जबाबदार धरावे, अशी मागणी मक्केतील विशाल मशिदीच्या इमामांनी केली आहे. त्याचबरोबर इमामांनी सौदी प्रशासनालाही अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना केली. शुक्रवारच्या उपदेशादरम्यान बोलताना इमाम शेख सालेह अल तालिब म्हणाले की, ईश्वराच्या पाहुण्यांची सेवा करीत असलेल्या हजारो लोकांचे कष्ट वाया जाऊ नयेत. मुस्लिमांचे पवित्र स्थळ काबा याच मशिदीत आहे. चेंगराचेंगरीबद्दल सौदी सरकारवर टीका करताना अल-तालिब म्हणाले की, मुस्लिमांबाबत होत असलेल्या कोणत्याही घटनेचा राजकीय लाभासाठी वापर करणे स्वीकारार्ह नाही. (वृत्तसंस्था)
हज शोकांतिकेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी इमामांची मागणी
By admin | Updated: September 28, 2015 02:04 IST