शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनच्या यादीत दाऊदचा समावेश

By admin | Updated: February 3, 2016 02:49 IST

ब्रिटनच्या आर्थिक निर्बंध यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा समावेश असून भारतासाठी मोस्ट वाँटेड असलेल्या दाऊदविरुद्ध आंतरराष्ट्रीय अटक वॉरंटही जारी करण्यात आलेले आहे

लंडन : ब्रिटनच्या आर्थिक निर्बंध यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा समावेश असून भारतासाठी मोस्ट वाँटेड असलेल्या दाऊदविरुद्ध आंतरराष्ट्रीय अटक वॉरंटही जारी करण्यात आलेले आहे. तो पाकिस्तानात असल्याचा दावा भारताने अनेकदा पुराव्यानिशी केलेला असला तरी पाकिस्तान मात्र दरवेळी इन्कार करीत आला आहे. तथापि, ब्रिटनच्या या संपत्ती जप्तीच्या यादीतील नोंद म्हणजे दाऊद पाकिस्तानात असल्याचा सज्जड पुरावाच आहे.ब्रिटनच्या वित्तमंत्रालयाने २७ जानेवारी २०१६ रोजी अद्ययावत केलेल्या एकत्रित अद्ययावत यादीत समावेश असलेला दाऊद हा एकमेव भारतीय नागरिक आहे. तसेच यादीत देण्यात आलेले त्याचे चारही ठावठिकाणे पाकिस्तानच्या कराचीतील आहेत.याशिवाय या यादीत लिबरेशन टायगर्स आॅफ तामिळ इलम (लिट्टे), खलिस्तान झिंदाबाद फोर्स, इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन आणि हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचाही समावेश आहे.यादीतील नोंदीनुसार दाऊद इब्राहीम कासकर, घर क्रमांक ३७, ३० मार्ग, डिफेन्स हाऊसिंग अ‍ॅथॉरिटी, कराची, घर क्रमांक २९, मरगल्ला रोड, एफ-६/२, स्ट्रीट नंबर २२, कराची, नूराबाद (पलातियल बंगला)आणि व्हाईट हाऊस, सौदी मशीद नजीक, क्लिफटन, कराची येथे राहतो.मुंबईत जन्मलेल्या दाऊदचा उल्लेख भारतीय असा करण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडे भारतीय पासपोर्ट असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तथापि, भारत सरकारने त्याचा पासपोर्ट रद्द केलेला आहे. त्याने अनेक भारत आणि पाकिस्तानी पासपोर्ट मिळवून त्याचा दुरुपयोग केला, असा उल्लेखही या यादीत करण्यात आला आहे. दाऊदविरुद्ध भारत सरकारने आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी केलेले आहे.ब्रिटनचे आर्थिक निर्बंध ब्रिटन किंवा परदेशातील व्यक्ती, संस्था-संघटना आणि सरकारसाठी लागू होऊ शकतात. आर्थिक निर्बंधातहत निर्बंध लागू करण्यात आलेल्या देशांत निधी पाठविण्यावर प्रतिबंध आहे. तसेच संपत्ती गोठविण्याबाबत लक्ष्यित देशांतील संस्था-संघटना आणि व्यक्तीची संपत्ती गोठविण्याचीही यात तरतूद आहे. तसेच काही आर्थिक निर्बंधानुसार विमा यासारख्या आर्थिक सेवा करण्यास किंवा पुरविण्यास मनाई आहे.