शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातील डॉनचं हिंदू मॅरेज बिलावर संपादकीय

By admin | Updated: January 29, 2016 15:39 IST

हिंदूंसाठी विवाह कायदाच नसल्यामुळे हिंदूंचे विशेषत: महिलांचे कसे हाल होतात, याची दखल पाकिस्तानमधलं प्रमुख वृत्तपत्र असलेल्या डॉननं संपादकीयात घेतली आहे

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २९ - पाकिस्तानात अल्पसंख्य असलेल्या हिंदूंसाठी विवाह कायदाच नसल्यामुळे हिंदूंचे विशेषत: महिलांचे कसे हाल होतात, याची दखल पाकिस्तानमधलं प्रमुख वृत्तपत्र असलेल्या डॉननं संपादकीयात घेतली आहे.
डॉन म्हणतं, अल्पसंख्याकांच्या अधिकाराचा विषय असला की वक्तव्यं करताना काही राजकीय नेते एकदम तत्पर असतात, परंतु या अधिकारांसाठी पावलं उचलायची वेळ आली की दाखवण्यासाठी फारसं काही उरत नाही. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अनेक दशकं प्रलंबित असलेलं हिंदू विवाह विधेयक
या घडीला पाकिस्तानात राहणा-या लाखो हिंदूंसाठी विवाह कायदाच नाहीये. यामुळे हिंदूंना अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावं लागतं. 
विशेषत: महिलांना सरकारी कागदपत्रे मिळवताना विवाहाचा पुरावा नसल्यामुळे नातेसंबंध सिद्ध करताना अडचणी येतात, तसेच बँकेत खातं उघडण्यासाठी व व्हिसासाठी अर्ज करण्यासाठीही महिलांना प्रचंड त्रास होतो. 
काहीजणांच्या मते हिंदूंच्या विवाहाचे दस्तावेजीकरण होत नसल्यामुळेही जबरदस्तीनं केलेल्या धर्मांतराना प्रोत्साहन मिळतं. 
इस्लामाबादमध्ये बुधवारी या विषयावर एक परिषद झाली, त्यामध्ये अडचणींचा पाढा वाचण्यात आला. पाकिस्तानी संसदेतल्या काही सदस्यांना या बिलातल्या काही तरतुदींवर हरकती आहेत, ज्यामुळे हिंदी मॅरेज बिल मंजूर होत नसल्याचं सांगण्यात येतंय.
विशेष म्हणजे, कुटुंब कायदा हा राज्यांचा विषय असून बलुचिस्तान व खैबर पख्तुनवा या प्रांतांनी या संदर्भातल्या तरतुदींना हिरवा कंदील दाखवला आहे, पण जिथे हिंदू जास्त प्रमाणात राहतात, त्या पंजाब व सिंधने मात्र फारसा  उत्साह दाखवलेला नाही. सिंध प्रांताने यासाटी तत्परता दाखवावी असं मत डॉननं व्यक्त केलं आहे. अन्यथा अल्पसंख्याकांच्या हक्कांविषयी आपण जागरूक असल्याची हाळी देणं ही पोकळ वल्गना ठरेल असं डॉननं म्हटलंय.