शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
3
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
4
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
5
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
6
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
8
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
9
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
10
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
11
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
12
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
13
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
14
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
15
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
16
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
17
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
18
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
19
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
20
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!

भारतात प्रवास करणे धोक्याचे - अमेरिका

By admin | Updated: March 7, 2017 08:42 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकांसाठी ट्रॅव्हल्स अ‍ॅडवायझरी जारी केलं असून भारतात जहालमतवादी सक्रीय असल्याने तेथे प्रवास करणे धोक्याचे आहे असा इशारा दिला आहे.

ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 7 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकांसाठी ट्रॅव्हल्स अ‍ॅडवायझरी जारी केलं आहे. या अ‍ॅडवायझरीमध्ये नागरिकांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा प्रवास करू नये, अशी सूचना अमेरिकेकडून करण्यात आली आहे. भारतातही जहालमतवादी सक्रिय आहेत, असंही ट्रॅव्हल्स अ‍ॅडवायझरीमध्ये म्हटलं आहे.अमेरिकन सरकारच्या मते, दक्षिण आशियातील दहशतवादी गट अमेरिकेतल्या नागरिकांना लक्ष्य करू शकतात, असंही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या या अॅडवायजरीमधून सल्ला देण्यात आला आहे. तसेच अमेरिकेच्या लोकांनी अफगाणिस्तानात जाण्याचं टाळलं पाहिजे. या देशातील कोणताही भाग हा हिंसेतून मुक्त नाही, अॅडवायझरीमधून पाकिस्तानलाही लक्ष्य करण्यात आलं आहे. पाकिस्तानात अनेक दहशतवादी गट आणि जातीय समूह सक्रिय आहेत. पाकिस्तानातले दुसरे जहालमतवादी लोकंही अमेरिकेच्या नागरिकांना धोका पोहोचवू शकतात, असंही म्हटलं आहे.

(सात मुस्लिम देशातील नागरिकांचा अमेरिका प्रवेशाचा मार्ग मोकळा)

तत्पूर्वी सात मुस्लिम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयावरून डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला माघार घ्यावी लागली होती. वॉशिंग्टनमधील न्यायालयाने ट्रम्प यांच्या आदेशाची अंमलबजावणी करू, नये असा निर्णय दिला होता. न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया आणि मासाच्युसेटस येथील न्यायालयानेही असाच निकाल दिला होता. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाला आपल्या निर्णयावरून माघार घ्यावी लागली होती. इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन या मुस्लीम देशांतील नागरिकांचा अमेरिकेत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ट्रम्प यांच्या आदेशामुळे देशातील नागरिकांना ९० दिवस प्रवेश बंदी लागू झाली होती. ज्यांच्याकडे वैध अमेरिकी व्हिसा आहे व ग्रीन कार्ड आहेत त्यांनाही याचा फटका बसला होता. मात्र आता ट्रम्प यांनी स्वतःच्याच देशातील नागरिकांना पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात जाण्याचं टाळण्याचा सल्ला दिला आहे.