शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुलीचे नाव ‘अल्ला’ ठेवण्याचा वाद कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 01:46 IST

अमेरिकेतील जॉर्जिया या राज्याच्या सरकारने तेथील एका दाम्पत्यास त्यांच्या मुलीचे नाव ‘अल्ला’ असे ठेवण्यास मज्जाव

वॉशिंग्टन : अमेरिकेतील जॉर्जिया या राज्याच्या सरकारने तेथील एका दाम्पत्यास त्यांच्या मुलीचे नाव ‘अल्ला’ असे ठेवण्यास मज्जाव केल्यावरून मानवी हक्क संघटनेने राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला आहे.एलिझाबेथ हॅण्डी आणि बिलाल वॉक या जोडप्याला २२ महिन्यांची एक मुलगी असून तिचे नाव झलिखा ग्रेसफूल लॉरियाना अल्ला असे ठेवावे, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र जॉर्जिया राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने त्यांना मुलीचे शेवटचे नाव अल्ला असे ठेवू देण्यास नकार दिल्याचे वृत्त ‘अ‍ॅटलांचा जर्नल कॉन्स्टिट्यूशन’ या वृत्तपत्राने दिले. राज्याच्या कायद्यानुसार मुलांना आई किंवा वडील यांचेच नाव लावता येते. त्यामुळे या दाम्पत्याने त्यांच्या मुलीचे शेवटचे नाव हॅण्डी किंवा वॉक अथवा ही दोन्ही नावे एकत्र करून ठेवावे, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.हा सरळसरळ अन्याय आहे व आमच्या हक्कांची पायमल्ली आहे, असे वॉक म्हणाले. मात्र याविरुद्ध या दम्पतीने कोणतेही पाऊल उचलले नसले तरी अमेरिकन सिव्हिल राइट््स युनियनच्या जॉर्जिया शाखेने राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात दिवाणी दाखल केला आहे. संघटनेच्या राज्य शाखेच्या कार्यकारी संचालिका अ‍ॅन्ड्रिया यंग म्हणाल्या की, पालकांनी त्यांच्या मुलांची नावे कोणती ठेवावीत व कोणती ठेवू नयेत हे सांगण्याशी सरकारचा काहीही संबंध येत नाही.सरकारची ही भूमिका पालकांच्या त्यांच्या मुलांचे संगोपन करण्याच्या हक्कात हस्तक्षेप करणारी आहे. (वृत्तसंस्था)धर्माशी संबंध नाही‘अल्ला’ हे नाव खानदानी असल्याने आम्ही ते निवडले आहे व त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही, असे हँडी व वॉक यांचे म्हणणे आहे. सरकारच्या या नकारामुळे आम्हाला मुलीचा जन्मदाखला मिळू शकत नाही. तो नसेल तर तिला सामाजिक सुरक्षा योजनेचा क्रमांक मिळणार नाही, शाळेत प्रवेश मिळणार नाही, तसेच प्रवास करतानाही अडचणी येतील.