शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भांडण नको म्हणून देशाचे नावच बदलले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:57 IST

पूर्वीच्या युगोस्लाव्हियातून वेगळे झालेल्या मॅसेडोनिया या देशाचे नाव बदलून ते ‘उत्तर मॅसेडोनिया प्रजासत्ताक’ असे करण्याबाबत रविवारी ग्रीस आणि मॅसेडोनिया यांच्यात करार झाला.

प्रेस्पेस (ग्रीस) : पूर्वीच्या युगोस्लाव्हियातून वेगळे झालेल्या मॅसेडोनिया या देशाचे नाव बदलून ते ‘उत्तर मॅसेडोनिया प्रजासत्ताक’ असे करण्याबाबत रविवारी ग्रीस आणि मॅसेडोनिया यांच्यात करार झाला. दोन्ही देशांच्या संसदेची संमती मिळाल्यावर आणि मॅसेडोनियाच्या जनतेने सार्वमतात अनुकूल कौल दिल्यावरच हा नावबदल प्रत्यक्षात अंमलात येईल.ग्रीसचे पंतप्रधान अ‍ॅलेक्सिस त्सिपरास आणि मॅसेडोनियाचे पंतप्रधान झोरान झाएव यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या अणि ही ऐतिहासिक जबाबदारी दोन्ही देश नक्की पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला. (वृत्तसंस्था)>कशामुळे पेटला होता वाद?हा वाद १९९१ पासून सुरू आहे. ग्रीसमध्येही मॅसेडोनिया नावाचा एक प्रांत आहे. युगोस्लाव्हियातून फुटून निघालेल्या सेजारी देशाने तेच नाव घेतल्याने भविष्यात तो त्याच नावाच्या आपल्या प्रांतावर आणि ग्रीक संस्कृतीवर हक्क सांगेल, असा ग्रीकवासियांचा आक्षेप आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वरीलप्रमाणे नावबदल करून मॅसेडोनियाचा ‘‘नाटो’ व युरोपीय संघातील प्रवेश् सुकर करण्याचा त्सिपरास यांचा प्रयत्न आहे.>सरकारवरच आले होते बालंट; ग्रीसच्या ७० टक्के नागरिकांचा विरोधमॅसेडोनिया या नावावरून ग्रीस आणि या शेजारी देशाचे संबंध कमालीचे ताणलेले आहेत. ‘नाटो’ व युरोपिय संघाचा ग्रीस सदस्य आहे, परंतु ‘मॅसेडोनिया’ या नावास ग्रीसमध्ये असलेल्या तीव्र विरोधामुळे मॅसेडोनियाचा या दोन्ही संघटनांमधील प्रवेश अडकून पडला आहे.या बाबतीत मॅसेडोनियाशी कोणताही तडजोड करण्यास ग्रीसच्या ७० टक्के नागरिकांचा विरोध आहे व याच मुद्द्यावर संसदेत मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावरील मतदानात त्सिपरास यांचे सरकार शनिवारी थोडक्यात बचावले होते.