शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

coronavirus: शी जिनपिंग यांना झाला कोरोनाचा संसर्ग? प्रचंड खोकल्यामुळे थांबवावे लागले भाषण

By बाळकृष्ण परब | Updated: October 16, 2020 15:37 IST

Xi Jinping News : कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या ठिकाणापासून सुरू झाला त्या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ठळक मुद्देबुधवारी हाँगकाँगपासून जवळच असलेल्या शेन्जेंगमध्ये एका कार्यक्रमावेळी शी जिनपिंग सतत खोकत असल्याचे दिसून आलेया कार्यक्रमातील संबोधनावेळी शेवटच्या दहा मिनिटांमध्ये मोठ्या प्रमाणात खोकला सुरू झाल्याने त्यांना काही काळासाठी भाषण थांबवाले लागलेजिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत चिनी सरकारी प्रसारमाध्यमांनी कुठलीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केलेली नाही

बीजिंग - कोरोना विषाणूने गेल्या दहा महिन्यांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. सर्वसामान्यांसोबतच जगातील अनेक देशांचे प्रमुख आणि इतर बड्या असामींना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या ठिकाणापासून सुरू झाला त्या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारी हाँगकाँगपासून जवळच असलेल्या शेन्जेंगमध्ये एका कार्यक्रमावेळी शी जिनपिंग सतत खोकत असल्याचे दिसून आले. तसेच या कार्यक्रमातील संबोधनावेळी शेवटच्या दहा मिनिटांमध्ये मोठ्या प्रमाणात खोकला सुरू झाल्याने त्यांना काही काळासाठी भाषण थांबवाले लागले. दरम्यान, जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत चिनी सरकारी प्रसारमाध्यमांनी कुठलीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केलेली नाही.चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भाषणाचे लाइव्ह प्रसारण सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या सीसीटीव्हीवर सुरू होते. जेव्हा त्यांना जोराचा खोकला येऊ लागला, तेव्हा टीव्ही चॅनेलने जिनपिंग खोकत असताना दिसणारा भाग कापण्यास सुरुवात केली. मात्र या दरम्यान ऑडियोमध्ये त्यांच्या खोकण्याचा आवाज येत होता. तसेच एक अशी चित्रफित समोर आली ज्यामध्ये जिनपिंग हे तोंडावर हात धरून खोकताना दिसत आहेत.या ऑडिओमध्ये जिनपिंग हे गळा साफ करण्यासाठी पाण्याच्या गुळण्या करत असल्याचे ऐकू येत होते. या प्रकारानंतर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची अफवा वेगाने पसरू लागली आहे. मात्र त्याला अद्यापही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान, हाँगकाँगमधील लोकशाही समर्थक अ‍ॅपल टीव्हीनेसुद्धा जिनपिंग यांना खोकल्यामुळे आपला दौरा अर्धवट सोडून बीजिंगला परतावे लागल्याचा दावा केला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा सापडू लागले आहेत. अधिकृतरीत्या दरदिवसी सुमारे १० हून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. मात्र अनेक तज्ज्ञांना चीनने दिलेल्या आकडेवारीवर शंका आहे. चीनने पहिल्यांदाच आपला विकासदर कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे चीन खरी आकडेवारी लपवून चुकीची माहिती जगाला देत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Xi Jinpingशी जिनपिंगchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या