देव तारी त्याला कोण मारी किंवा आयुष्याची दोरी बळकट असणं या म्हणी एरव्ही आपण सहज वापरतो. मात्र सध्या सारं जग या म्हणींचा अर्थ नव्यानं समजून घेत आहे.त्याचंच एक उदाहरण म्हणजे इटलीतली ही अदा आजी. अदा झानुसो असं आजींचं नाव. त्या 104 वर्षाच्या आहेत. त्या ज्या नर्सिग होम मध्ये रहायच्या तिथं कोरोना पोहोचला. वृद्धांचा काळ ठरला. आजींच्या नर्सिग होममधल्या 2क् जणांनी कोरोनासमोर माघार घेतली. आजींनाही लागण झाली. ताप, उलटय़ा, श्वास घ्यायला त्रस होणं सुरु झालं.त्यांच्यावर उपचार सुरु झाले. मात्र आजींची जगण्याची उर्मी दांडगी. त्यांनी औषधांना प्रतिसाद दिला. त्यांच्या डॉक्टर सांगतात की, ‘आजींना त्रस खूप होत होता. वृद्ध दगावत होते हे आम्ही पाहतच होतो. त्याच आजींचं वय जास्त.मात्र त्यांच्या प्रतिकार शक्तीला त्यांच्यातल्या खळाळत्या उत्साहानं आणि मिश्किल बौद्धिक ताकदीनं साथ दिली आणि आजी ब:या होत स्वत:हून पलंगावरुन उठून व्हील चेअरमध्ये जाऊन बसल्या. त्या ब:या झाल्या, याचा आनंद मोठा आहे.!‘
coronavirus survivor : 104 वर्षाच्या आजींची ‘अदा’ कोरोनावर केली मात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:57 IST
इटलीतली ही अदा आजी. अदा झानुसो असं आजींचं नाव
coronavirus survivor : 104 वर्षाच्या आजींची ‘अदा’ कोरोनावर केली मात!
ठळक मुद्देआजींची जगण्याची उर्मी दांडगी.