शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

उपाशी उंदरांचं टोळीयुद्ध: अमेरिकेत भूकेल्या उंदरांचा रस्त्यावर सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 13:16 IST

बाल्टीमोर, वॉश्ंिगटन या शहरात गेल्या 30 दिवसांत 500 कॉल्स हेल्पलाइनवर आलेत की, आमच्या भागात फार उंदीर झालेत, मदत करा.

ठळक मुद्देउंदीर रस्त्यावर फिरू लागलेत आणि त्यापासून आता अजून काही वेगळा आजार होऊ नये असं भय अमेरिकेतल्या मोठय़ा शहरांत दाटलं आहे.

काय आपल्याकडचे लोक, सरकार एवढं सांगतंय घरात बसा, तरी घरात बसायला तयार नाहीत, असं त्रग्यानं आपण म्हणतोही अनेकदा. आणि एरव्हीही आपण विदेशातल्या शिस्तीचं भारी कौतूक करायचो. तिकडे कशी स्वच्छता, तिकडे कसे लोक सिगAल पाळतात, तिकडे कसे सिट बेल्ट लावतात, तिकडे कसं रस्त्यात कुणी थुंकत नाही. असे पाढे  विदेश वारी विशेषत: अमेरिका दौरा करुन आलेल्यांकडून नेहमी ऐकवले जातात.ते खोटं किंवा गैरलागू असतं असंही नाही. मात्र कोरोनाच्या काळात आपल्या अवाढव्य पसारा असलेल्या देशानं जे करुन दाखवलं ते लॉक डाऊन खरोखर अभूतपूर्व आहे. पंतप्रधानांनीही त्याचं भाषणात कौतूक केलं. त्याचं कारण असं की, लोकसंख्येची प्रचंड घनता असूनही लोकांनी लॉक डाऊन ब:यापैकी उत्तम पाळलं.आणि तिकडे अमेरिकेत ते ही न्यूयॉर्कमध्ये सरकार लोकांसाठी ‘अॅडव्हायजरी’ काढून थकलं की, फिरायला जाऊ नका, परस्परांपासून लांब रहा, मास्क लावा मात्र तरीही लोक जुमानत नाहीत असं चित्र आहे. 21 हजार लोक अमेरिकेत कोरोनाला बळी पडलेत तरी लोक अजून त्यांचं गांभिर्य समजायला तयार नाही. म्हणून तर आजही न्यूयॉर्कच्या सेण्ट्रल पार्क मध्ये फिरायला येणा:यांची, मॉर्निग वॉक करणा:यांची गर्दी दिसते. त्यातले काही मास्कही लावत नाहीत. 6 फुट अंतर ठेवा असं वारंवार सांगूनही लोक ते ऐकत नाहीत., गाइडलाइन्स पाळत नाहीत. न्यू यॉर्कचे महापौर बिल डे ब्लासियो म्हणतात, महिना झाला आम्ही सतत सूचना देतो आहोत, लोकांना सांगत आहोत, पण लोक ऐकत नाहीत. यासंदर्भात आता कठोर होण्यापलिकडे आमच्याहाती फार पर्याय उरलेले नाहीत.एकीकडे माणसं अशी ऐकत नाहीत, दुसरीकडे आता उंदीरही धीट झालेत ते कुणाला जुमानत नाहीत असं चित्र आहे.अमेरिकेतही अनेक शहरांत हॉटेल्स, रेस्टॉरण्ट, किराणा दुकानं बंद झाली.त्यात उंदरांचेही खाण्याचे हाल होऊ लागलेत.आता उंदीर रस्त्यावर आलेत. सैरावैरा पळत आहेत. त्यांना खायला काही नाही म्हणून ते या भागातून त्या भागात जात आहेत.तिथं उंदरांमध्येही टोळी युद्ध अटळ आहे. त्या लढाईत जो जिंकेल, तो भाग त्याचा, जो शक्तीशाली तो वाचणार हे तर उघडच आहे. रोडण्ट अर्थात या कृदंत प्राण्यांचे तज्ज्ञ रोडण्टोलॉजिस्ट बॉबी कॉरीगॅन सांगतात. उंदीर तरी काय हा माणसासारखाच सस्तन प्राणी आहे. एरव्ही तो वेगळा वागत असला तरी भूक लागली की, तो वेगळा वागतो. भूक जेंव्हा त्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न होते, तेव्हा तो त्या भूकेसाठी हल्ला करणं, मारणं हे करतोच.त्यामुळे आपल्या भागात खायला मिळत नसेल तर उंदीर दुस:या भागात जाणार हे उघड आहे.’त्यामुळेच सध्या अमेरिकेत उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. तो ही अनेक मोठय़ा शहरांत.  बाल्टीमोर, वॉश्ंिगटन या शहरात गेल्या 30 दिवसांत 500 कॉल्स हेल्पलाइनवर आलेत की, आमच्या भागात फार उंदीर झालेत, मदत करा.माणसं घरात अडकली, खाण्यापिण्याच्या जागा ओस पडल्या, तसे उंदीर रस्त्यावर फिरू लागलेत आणि त्यापासून आता अजून काही वेगळा आजार होऊ नये असं भय अमेरिकेतल्या मोठय़ा शहरांत दाटलं आहे.