शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: नेपाळची हिंमत वाढली?; कोरोनाच्या फैलावावरून भारतावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 19:43 IST

Coronavirus News: नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे गंभीर आरोप

काठमांडू: नवा नकाशा प्रसिद्ध करून भारताच्या अखत्यारित असलेल्या प्रदेशावर दावा केल्यानंतर आता नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी भारतावर गंभीर आरोप केला आहे. दक्षिण आशियातील अन्य देशांच्या तुलनेत नेपाळमधील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर कमी आहे. मात्र भारतातून येणाऱ्या व्यक्ती पुरेशा तपासण्यांशिवाय नेपाळमध्ये प्रवेश करत असल्यानं कोरोनाचा फैलाव वेगानं होत असल्याचा आरोप ओली यांनी केला.नेपाळमध्ये आज कोरोनाचे ७२ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशातल्या कोरोनाबाधितांचा आकडा ६७५ वर जाऊन पोहोचला. याचं खापर नेपाळनं भारतातून येणाऱ्या व्यक्तींवर फोडलं आहे. नेपाळनं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन दोन जूनपर्यंत वाढवला आहे. नेपाळमध्ये २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. नेपाळ सरकारनं सर्व आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक १४ जूनपर्यंत बंद ठेवली आहे.भारतातून येणाऱ्या व्यक्तींमुळे कोरोनाचा फैलाव वेगानं होण्याचा आरोप करणाऱ्या नेपाळनं गेल्याच आठवड्यात नवा नकाशा प्रसिद्ध केला. या नकाशातून नेपाळनं लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरामधल्या एकूण ३९५ चौरस किलोमीटरच्या प्रदेशावर दावा सांगितला. हा संपूर्ण भाग भारतीय हद्दीत येतो. नेपाळच्या भू व्यवस्थापन आणि सुधारणा मंत्री पद्मा अरयाल यांनी सरकारच्या वतीनं नवा नकाशा प्रसिद्ध केला. लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी सोबतच गुंजी, नाभी आणि कुटी गावांवरही नेपाळनं दावा सांगितला. नेपाळनं नव्या नकाशात कालापानीतल्या ६० किलोमीटर भागावर दावा केला आहे. यासोबतच लिंपियाधुरामधल्या ३३५ किलोमीटर भागही नकाशात दाखवला आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्त्वाखालील कॅबिनेटनं नव्या नकाशाला मंजुरीदेखील दिली.'तो' भाग आमचाच! नेपाळकडून नवा नकाशा प्रसिद्ध; भारताच्या ३९५ चौरस किलोमीटर प्रदेशावर दावाठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या सोमय्यांवर आली 'ते' ट्विट डिलीट करायची वेळमी मंत्री असल्यानं नियमाला अपवाद; मोदींच्या सहकाऱ्याचा क्वारंटिनला नकार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNepalनेपाळ