शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

coronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान थांबता थांबेना, जगभरात 90 हजारांहून अधिक मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 09:11 IST

जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 90 हजारांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही इटली, स्पेन आणि अमेरिकेतील रुग्णांची आहे.

ठळक मुद्देजगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 90 हजारांच्या वर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही इटली, स्पेन आणि अमेरिकेतील रुग्णांची आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा साडेपाच हजारांच्या वर पोहोचला आहे

 न्यूयॉर्क - संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 90 हजारांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही इटली, स्पेन आणि अमेरिकेतील रुग्णांची आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा साडेपाच हजारांच्या वर पोहोचला आहे. 

कोरोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत 90 हजार 938 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 18 हजार 279 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्येही कोरोनामुळे मृत्यूचे थैमान सुरू आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 15 हजार 238 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या अमेरिकेत  कोरोनामुळे 14 हजार 830 जणांचा मुत्यू झाला आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहे. न्यूयॉर्कमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कोरोनामुळे 799 जणांचा मृत्यू झाला आहे. तर फ्रान्समध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 10 हजार 869 जणांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, जगभरात आतापर्यंत 15 लाख 34 हजार 426 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगातील सुमारे 200 हुन अधिक देशात कोरोनाचा फैलाव झाला असून, जगातील अनेक देशात उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयUnited StatesअमेरिकाItalyइटली