शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : जपान सरकारचा कंपन्यांना आदेश चिनमधून बाहेर पडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 18:26 IST

आता अनेक देश आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि भविष्याचा विचार करुन जपानसारखाच वेगळा विचार करण्याचीही शक्यता आहे.

ठळक मुद्देजगात एक पुरवठा साखळी तयार झाली होती ती कोरोनाने आताच तोडली आहे.

कोरोनानंतर अर्थव्यवस्थांचे काय असा प्रश्न आहेच. जागतिक अर्थव्यवस्था आणि व्यापार यांचं काय होईल, ते काय दिशेनं जाईल याचे आता केवळ अंदाज बांधले जात आहेत.मात्र भविष्यात काय होईल याची झलक आता दिसू लागली आहे.जपानने आपल्या मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्यांना सांगितलं आहे की, चिनमधे असलेलं तुमचं काम थांबवा. युनिट बंद करा. ते जपानमध्ये आणा नाहीतर  जगातल्या दुस:या कुठल्या देशात हलवा.पण चीनमध्ये मात्र आता मॅन्यूफॅक्चरिंग करायचं नाही.त्यापायी या कंपन्यांचं जे नुकसान होऊ शकेल त्याची घसघशीत रक्कम मोजायची तयारीही जपान सरकारने दाखवली आहे.त्यासाठी जपानने वेगळी आर्थिक तरतूद केली असून सुमारे 2क्क् कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम कंपन्यांना शिफ्टिंगसाठी देता यावी म्हणून देण्यात येतील असे जाहीर करण्यात आले आहे. अन्य देशात आपली कंपनी हलवणा:यांनाही घसघशीत आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे जपान सरकारने जाहीर केले असून त्यासंदर्भातला आराखडा ऑनलाइन टाकण्यात आल्याचे वृत्त  ब्लूमबर्ग न्यूजने दिले आहे.हे मॅन्यूफॅक्चरिंग युनिट  चिनमधून हलवण्याचे कारण म्हणजे जपान सरकारला आता असं वाटतं आहे की, आपल्या कंपन्या मॅन्यूफॅक्चरिंग बेस म्हणून चीनवर अवलंबून आहेत, ते अवलंबित्व कमी करायला हवे.एक सरकारी समिती गठित करण्यात आली असून ती समिती भविष्यात कुठे आणि कशी गुंतवणूक करावी यासंदर्भात अभ्यास करुन अहवाल देणार आहेत. त्या समितीनेच हे सुचवलं की, अतिशय महत्वाच्या वस्तू ( हाय एडेड व्हॅल्यू प्रॉडक्ट्स) चे उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग जपानमध्येच करणं योग्य ठरणार आहे. तसं करावं. आणि बाकी वस्तूंचं उत्पादनही चिनऐवजी अन्य दक्षिण-पूर्व आशियाई देशांत विखरुन करण्यात यावं.जपान सरकारच्या या निर्णयावर चीन आणि बाकी देश काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं गरजेचं आहे. मात्र चिनने कोरोनाचा उद्रेक लपवला आणि झाकपाक केली, त्याची किंमत सा:या जगाला मोजावी लागत आहे असं जगभर बोललं जातं, तेच या निर्णयाचा पाया ठरलं असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच जपाने ही पाऊलं उचलली असावीत असा अंदाज आहे.ब्लूमबर्ग न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, आपली मॅन्युफॅक्चरिंग युनिट चिनमध्ये असल्याने अनेक जपानी व्यावसायिक, कंपन्या यांना गेल्या महिन्यात मोठा अर्थिक फटका बसला. चीन हा जपानचा मोठा व्यावसायिक भागिदार आहे. मात्र चिनमध्ये लॉकडाऊन झालं, फॅक्ट:या बंद झाल्या, काम थांबलं त्यामुळे आयात कमी झाली. जपानी उद्योजकांना कामासाठी आवश्यक वस्तू, अवजारं, घटक मिळेनात आणि त्याचा फटका जपानी अर्थव्यवस्थेलाही बसला.टोक्यो शोको रिसर्च या संस्थेनं फेब्रुवारीत एक  सव्र्हेक्षण केलं होतं. 26क्क् कंपन्या त्यात त्यांनी नोंदवल्या. त्यात 37 टक्के कंपन्यांनी असं सांगितलं होतं की, चीनमध्ये सुरु असलेलं आपलं काम आता अन्य देशात नेण्याची गरज आहे. तसं विकेंद्रीकरण त्यांनी सुरु केलं आहे.कोरोना नंतर जग आधीसारखं राहणार नाही. जगात एक पुरवठा साखळी तयार झाली होती ती कोरोनाने आताच तोडली आहे. आणि आता अनेक देश आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि भविष्याचा विचार करुन जपानसारखाच वेगळा विचार करण्याचीही शक्यता आहे.