शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: धन्यवाद प्रिय मित्रा! ट्रम्प यांच्या पाठोपाठ आणखी एका मित्रानं मानले मोदींचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 08:12 IST

coronavirus हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन निर्यात करण्याच्या भारताच्या निर्णयाचं जगभरातून कौतुक

जेरुसलम: जगभरात कोरोना विषाणूचा वेगानं फैलाव होत आहे. कोरोनावरील उपचारात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे या औषधासाठी अमेरिकेसह अनेक देशाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधला होता. भारतानं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी सर्व प्रमुखांनी केली होती. यानंतर भारतानं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची निर्यात सुरू केली. या निर्णयानंतर ट्रम्प यांनी मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. यानंतर आता मोदी यांचे मित्र आणि इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांनीदेखील मोदींची स्तुती केली आहे.इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी ट्विट करून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. नेतान्याहू यांनी ट्विटमध्ये मोदींचा उल्लेख 'प्रिय मित्र' असा केला आहे. 'क्लोरोक्वीन पाठवल्याबद्दल माझे प्रिय मित्र नरेंद्र मोदींचे धन्यवाद,' असं ट्विट नेतान्याहू यांनी केलं आहे. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनीदेखील मोदींचे आभार मानले आहेत. बोल्सोनारो यांनी तर मोदींची तुलना थेट लक्ष्मणासाठी संजीवनी आणणाऱ्या हनुमानाशी केली होती. भारतानं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची निर्यात करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ट्रम्प यांनी आनंद व्यक्त केला. भारतानं संकटाच्या काळात केलेली मदत विसरण्यासारखी नाही, असं म्हणत मोदींचा उल्लेख महान नेते असा केला. तर योग्य वेळी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन पाठवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ब्राझीलच्या अध्यक्षांनी मोदी आणि भारतीयांचे आभार मानले. भारताकडून मोठ्या प्रमाणात हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनची निर्यात केली जाते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIsraelइस्रायलBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प