शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

coronavirus: कोरोना विषाणूंचा प्रसार हवेतूनही होऊ शकतो; २३९ वैज्ञानिकांनी ‘डब्ल्यूएचओ’ला दिले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 07:27 IST

विविध देशांमधील निर्बंध शिथिल केले गेल्यानंतर तेथील संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले यावरून वायूविजनाची चांगली व्यवस्था नसलेल्या बंदिस्त जागांमध्ये कोरोनाचे विषाणू बराच काळ हवेत टिकून राहतात व अत्यंत सूक्ष्म कणांच्या माध्यमातून त्यांचा संसर्घ होऊ शकतो, याच पुष्टी मिळते.

न्यूयॉर्क : सध्या जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूंचा प्रसार हेवेतूनही अत्यंत सूक्ष्म कणांच्या माध्यमातून होऊ शकतो याचे पुरावे असल्याचा दावा जगभरातील ३२ देशांमधील २३९ वैज्ञानिकांनी केला असून तसे पत्र त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेस लिहिले आहे.‘न्यूयॉर्क टाइम्स’ या दैनिकाने हे वृत्त देताना म्हटले की, विविध देशांमधील निर्बंध शिथिल केले गेल्यानंतर तेथील संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले यावरून वायूविजनाची चांगली व्यवस्था नसलेल्या बंदिस्त जागांमध्ये कोरोनाचे विषाणू बराच काळ हवेत टिकून राहतात व अत्यंत सूक्ष्म कणांच्या माध्यमातून त्यांचा संसर्घ होऊ शकतो, याच पुष्टी मिळते. हे वैज्ञानिक त्यांचे हे संशोधन व त्यावरून काढलेले निष्कर्ष पुढील आठवड्यात आघाडीच्या वैज्ञानिक नियतकालिकांतही प्रसिद्ध करणार आहेत.या वैज्ञानिकांनी व्यक्त केलेले हे मत ‘डब्ल्यूएचओ’ने सुरुवातीपासून ठामपणे केलेल्या दाव्याला छेद देणारे आहे. कोरोना विषाणूंचा प्रसार शिंक, खोकला याव्दारे नाक व तोंडातून बाहेर उडणाऱ्या शिंतोड्यांमुळे होतो, असे डब्ल्यूएचओ सुरुवातीपासून सांगत आली आहे व तशा प्रकारच्या संसर्गाला मज्जाव करण्यासाठीच संयुक्त राष्ट्र संघाच्या या आरोग्य संघटनेच्या शिफारशीवरून नाका-तोंडाला मास्क लावणे, गर्दी न करता दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवणे, हात वारंवार साबणाच्या पाण्याने धुणे व सर्वत्र सॅनिटायजरचा वापर करणे हे उपाय गेले तीन महिने जगभर लागू केले गेले आहेत.हा विषाणू हवेतूनही पसलू शकतो, या दाव्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आतापर्यंत केलेले उपायही तोकडे पडणार आहे. जवळपास सर्वच देशांना यासाठी आपल्या रणनितीमध्ये मोठा बदल करावा लागण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)या साथीवर अधिकाधिक प्रभावी उपाय योजता यावेत यासाठी सर्व शक्यता वैज्ञानिक निकषांच्या आधारे तपासून पाहण्याची आमची तयारी आहे. लोकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, हाच आमचा उद्देश आहे. -डॉ. सौम्या स्वामिनाथन,प्रमुख वैज्ञानिक, डब्ल्यूएचओविषाणूंचा हवेतून प्रसार होण्याची शक्यता वर्तविणारे पुरावे ठोस खात्री पटविणारे वाटत नाहीत. ही शक्यता गेल्या काही महिन्यांत आम्ही तपासून पाहिली आहे. पण अजूनही मतभेदांना जागा आहे.- डॉ. बेनेडेट्टा अ‍ॅसेग्रांझी,मुख्य संसर्गतज्ज्ञ, डब्ल्यूएचओसध्याचे खबरदारीचे उपाय पुरेसे नाहीतया वैज्ञानिकांच्या पत्राच्या आधारे न्यूयॉर्क टाइम्स म्हणते की, कोरोनाच्या या साथीच्या प्रसारात हवेतून होणाºया विषाणू संसर्गाचाही खरेच मोठा भाग असेल तर केवळ सार्वजनिक ठिकाणीच नव्हे तर बंदिस्त अशा खासगी जागांमध्येही प्रसार रोखण्यासाठी यापुढे वेगळ््या प्रकारची काळजी घेण्याची गरज भासणार आहे.‘एन-९५’च आवश्यक : अशा स्थितीत बचावासाठी घरे व कार्यालयांमध्येही अगदी लहानात लहान कणही थोपविले जातील असे ‘एन-९५’ हेच मास्क वापरणे गरजेचे ठरणार आहे.प्रभावी फिल्टर हवे : अशा शाळा, नर्सिंग होम, व्यापारी आस्थापने, घरांमध्येही एअर कंडिशनर यंत्रांना अधिक प्रभावी फिल्टर बसविणे व बंदिस्त जागेत हवेचे परिवलन कमीत कमी होईल अशी व्यवस्था करावी लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीय