शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : जपानमध्ये कोरोनाचा फैलाव वाढला, सात ठिकाणी आणीबाणी घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 16:34 IST

टोकियो आणि ओसाका शहरात कोरोनाचा होत असलेल्या फैलाव विचारात घेऊन यापूर्वीच आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती.

ठळक मुद्देपंतप्रधान शिंजो आबे यांच्याकडून आज देशातील टोकियो आणि ओसाकासह अन्य पाच प्रांतात आणीबाणीची घोषणाजपानमधील आणीबाणी आज रात्रीपासून अमलात येण्याची शक्यतासैतमा, कांगवा, चीबा, हयोगो आणि फुकुओका या भागांचा आणीबाणीची घोषणा करण्यात आलेल्या भागांत समावेश

टोकियो - चीनपासून जवळ असूनही गेल्या काही महिन्यांपासून जपान कोरोना विषाणूच्या प्रकोपापासून बचावला होता. मात्र आता जपानमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला असून, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शिंजो आबे यांनी आज देशातील टोकियो आणि ओसाकासह अन्य पाच प्रांतात आणीबाणीची घोषणा केली आहे.

 देशात अशी परिस्थिती निर्माण होत आहे ज्यामुळे लोकांचे जीवन आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे, असे शिंजो आबे यांनी आणीबाणीची घोषणा करताना सांगितले. आणीबाणी जाहीर झाल्यानंतर आता देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, टोकियो आणि ओसाका शहरात कोरोनाचा होत असलेल्या फैलाव विचारात घेऊन यापूर्वीच आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान आबे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावून  आणीबाणीबाबत चर्चा केली. 

जपानमधील आणीबाणी आज रात्रीपासून अमलात येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे सात प्रांतातील गव्हर्नरांना विशेषाधिकार मिळतील. त्यानुसार ते लोकांना घरात राहण्याचे तसेच, उद्योगधंदे बंद करण्याचे आदेश देऊ शकतील. जपानमधील ज्या भागात आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे त्यामध्ये सैतमा, कांगवा, चीबा, हयोगो आणि फुकुओका या भागांचा समावेश आहे. जपानमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो अशी भीती जपानी सरकारला वाटत आहे. त्यामुळेच देशात आणीबाणी जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJapanजपान