शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कराचीत विमानतळावर पुन्हा गोळीबार सुरू

By admin | Updated: June 9, 2014 10:53 IST

पाकिस्तानमधील कराची येथील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दहशवाद्यांचे तांडव पुन्हा एकदा सुरू झाले असून पुन्हा एकदा गोळीबाराला सुरूवात झाली आहे.

ऑनलाइन टीम
कराची, दि.९ - पाकिस्तानमधील कराची येथील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दहशवाद्यांचे तांडव पुन्हा एकदा सुरू झाले असून पुन्हा एकदा गोळीबाराला सुरूवात झाली आहे. जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-१ वर पुन्हा गोळीबार सुरू झाल्याचे वृत्त असून तेथे आणखी तीन दहतशवादी लपल्याचे समजते. 
रविवारी मध्यरात्री दहशतवाद्यांनी विमानतळावर केलेल्या हल्ल्यात दहा दहशतवाद्यांसह २३ जण ठार झाले. रात्रभर चाललेल्या या हल्यानंतर लष्कराने दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. मात्र सोमवारी सकाळी गोळीबाराल पुन्हा सुरूवात झाली आहे. दरम्यान, तेहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची स्वीकारली आहे.
सरकारी अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी विमानतळात घुसून हल्ला केला. हजला जाणारे यात्रेकरू आणि व्हीव्हीआयपी या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. तसेच विमान अपहरण करण्याचाही त्यांचा मनसुबा होता असे समजते.  दहशतवाद्यांनी प्रथम हॅन्डग्रेनेड फेकण्यास सुरूवात केली व अंदाधुंद गोळीबारही केला.  रात्रभर चाललेल्या या धुमश्चक्रीत लष्कराने दहाही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले. या हल्ल्यात सुमारे १८ जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
लष्कराने विमानतळावर ताबा मिळवला असून घटनास्थळाहून रॉकेट लाँचर, हॅन्ड ग्रेनेड, बंदुका व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. 
दरम्यान या हल्ल्यात विमानतळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संपूर्ण विमानतळ रिकामे करण्यात आले असून सुरक्षेच्या कारणास्तव विमान वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.हॅन्डग्रेनेड हल्ल्यामुळे विमानतळावर मोठी आग भडकून त्यात विमानतळावरील अनेक विमानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान 'जमात उद दावा' या दहशतवादी संघटनेचा नेता हफिझ सईदने या हल्ल्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार ठरवले आहे. मोदींची नवी सरक्षा टीम या हल्ल्यासाठी जबाबादार असून खरा शत्रू कोण आहे , हे देशाला माहीत आहे, असे ट्विट त्याने केले आहे.