शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कनेक्टिव्हिटी, नेट निरपेक्षता राहू शकतात एकत्र

By admin | Updated: April 18, 2015 00:05 IST

भारतात युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटी संपर्क म्हणजेच युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट निरपेक्षता एकत्र नांदू शकतात,

न्यूयॉर्क/नवी दिल्ली : भारतात युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटी संपर्क म्हणजेच युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट निरपेक्षता एकत्र नांदू शकतात, असे प्रतिपादन फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने केले आहे. झीरो रेटिंग प्लॅनमुळे भारतात इंटरनेट निरपेक्षता धोक्यात आल्याची टीका होत असताना झुकेरबर्गचे वक्तव्य आले आहे. झीरो रेटिंगवरील टीकेबाबत त्याने असहमती दर्शविली. त्याने म्हटले की, फेसबुकच्या नेतृत्वाखालील इंटरनेट डॉट ओआरजीला भारतासह अनेक देशांत मोफत इंटरनेट सेवा देण्याची अनुमती आहे. आम्हाला या प्रगतीवर अभिमान आहे. काही लोक झीरो रेटिंगच्या अवधारणेवर टीका करीत आहेत. निवडक सेवा मोफत दिल्याने नेट निरपेक्षता धोक्यात येईल, असे त्यांना वाटते. तथापि, या युक्तिवादाशी मी सहमत नाही.दरम्यान इंटरनेट नि:पक्षपातीपणाच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादात अडकलेल्या भारती एअरटेलने आमच्या टोल फ्री प्लॅटफॉर्मवर असतील किंवा नसतील तरीही सगळ्या वेबसाईटस् आणि अ‍ॅप्लिकेशन्सशी आमची वागणूक दुजाभावाची असणार नाही, असे शुक्रवारी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात सादर झालेल्या एअरटेल- झीरो या खुल्या बाजारात ग्राहकांना काही मोबाईल अ‍ॅप्स विनामूल्य उपलब्ध असतात व त्यांचा खर्च अ‍ॅप्स बनविणारी कंपनी सोसते. इंटरनेटच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल भारती एअरटेलवर सोशल मीडियातून जोरदार हल्ला करण्यात आला होता. ४भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत व दक्षिण आशिया) गोपाल विठ्ठल यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक पत्र पाठविले आहे. ४विठ्ठल यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत आपल्याला एअरटेल झीरोवर खूप चर्चा बघायला मिळाली. या चर्चेचे स्वरूप असे आहे की जणू आम्ही इंटरनेट नि:पक्षपाती धोरणाचे उल्लंघन करीत आहोत. सोशल मीडियातून काही गटांतून पाठविण्यात येत असलेल्या सूचनांची आम्हाला काळजी आहे. आम्ही पूर्णपणे इंटरनेट नि:पक्षपातीपणाच्या बाजूने आहोत. ४एअरटेल झीरो माध्यम सगळे अ‍ॅप्स डेव्हलपर्स, कंटेट प्रदाता आणि इंटरनेट साईटस्साठी समान पद्धतीने उपलब्ध आहे व सगळ्यांना एकसारखे दर लागू असल्याचे मी यानिमित्ताने स्पष्ट करू इच्छितो, असे गोपाळ विठ्ठल यांनी त्यात म्हटले.