शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

अमेरिकेतील कोरोनाची स्थिती गंभीर; नवनियुक्त राष्ट्राध्यक्षांची ट्रम्प प्रशासनाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 05:45 IST

CoronaVirus News: अमेरिकेत वाढत्या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोना महामारीची स्थिती गंभीर झाली असून, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने याबाबत तात्काळ कारवाई करावी,अशी मागणी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे.

बायडेन यांना कोरोनासंबंधी वाढत्या प्रकोपाबाबत कोविड-१९ सल्लागार बोर्डाचे सहअध्यक्ष डॉ. विवेक मूर्ती, डॉ. डेविड केसलर व डॉ. मार्सेला नुनेज-स्मिथ यांनी माहिती दिली. बायडेन म्हणाले की, त्यांनी जे सांगितले ते भीषण आहे. आपल्या देशात संक्रमित रुग्ण वेगाने वाढत आहेत. रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या महामारीने अनेक मृत्यू होत आहेत. संपूर्ण देशात स्थिती भीषण झाली आहे.

या आठवड्यात एक सुरक्षित व प्रभावी कोरोना लस बनविण्याच्या दिशेने एक चांगली खबर आली आहे. बायडेन म्हणाले की, मी राष्ट्राध्यक्षपदासाठी निर्वाचित झालो असून, पुढील वर्षी राष्ट्रध्यक्ष बनणार आहे. तोपर्यंत महामारी थांबणार नाही. यात सारखी वाढच होत राहणार आहे. स्थितीचे गांभीर्य ओळखून सध्याच्या प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे.ट्रम्प प्रशासनाचा देशव्यापी लॉकडाऊनला नकारn अमेरिकेत वाढत्या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. लॉकडाऊनमुळे लोकांचे जीवन, तसेच अर्थव्यवस्थाही प्रभावित होते, असे ते म्हणाले.n व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अमेरिकेवर याचा सर्वांत मोठा आर्थिक दबाव पडला आहे. कोणत्याही प्रमुख पश्चिमी देशांच्या तुलनेत सर्वाधिक सुधारणा केल्या आहेत.n अमेरिकेत आतापर्यंत कोरोना व्हायरसचे एक कोटीपेक्षा अधिक रुग्ण समोर आले आहेत, तसेच २,४४,३०२ जणांचा मृत्यू झाला आहे.n ट्रम्प म्हणाले की, स्वस्थ झालेले अमेरिकी कामावर तसेच विद्यार्थी शाळांमध्ये जाऊ लागले आहेत. आम्ही कमजोर लोकांच्या सुरक्षेत कोणतीही कमी पडू देत नाही. एका अनुमानानुसार, राष्ट्रीय लॉकडाऊनमुळे एका दिवसात ५० अब्ज डॉलसर्सचे नुकसान होते व हजारो रोजगार समाप्त होतात. त्यामुळे आम्ही लॉकडाऊन करणार नाही. भविष्यात जे काही होईल ते चांगले होईल, अशी आशा आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या